२०२५ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत
अंधाऱ्या रात्री आपण आकाशाकडे नजर टाकल्यास आपणास आकाशाचे नयनरम्य विलोभनीय दर्शन होते . ज्याचे आपल्या सर्वांनाच प्रचंड आकर्षण असते आपण आकाशाचे निरीक्षण करत असताना जर एखादा खगोलीय अविष्कार आकाशात दिसत असेल तर मग सोन्याहून पिवळे . या २०२५ वर्षात सुद्धा अश्या काही घटना आहेत ज्यावेळी आकाशाचे दर्शन करणे अत्यंत ऊत्तम आहे . चला तर जाणून घेउया या विषयी .
या खगोलीयघटनांचे आपण सूर्यग्रहण , चंद्रग्रहण , उल्का वर्षाव ., धूमकेतूचे दर्शन , सूर्यमालिकेतील ग्रहांचे विलोभनीय दर्शन , विविध ग्रहांची एकमेकांशी होणारी युती . यासारख्या विविध प्रकारात विभाजन करू शकतो . त्यातील उल्का वर्षाव या प्रकारातील घटना सर्वप्रथम बघूया
वर्षाची सुरवातच उल्कावर्षांवाने होणार आहे १ हे ५ जानेवारीदरम्यान क्वाड्रंटिड्स हा उल्कावर्षाव बघता येईल या उल्कावर्षावात जास्तीत जास्त प्रतितास ४० उल्का असतात. २००३ मध्ये सापडलेल्या 2003 EH1 नावाच्या सध्या नामशेष झालेल्या धूमकेतूने मागे सोडलेल्या धुळीच्या कणांनी त्याची निर्मिती केली असल्याचे मानले जाते. हा उलकवर्षाव दरवर्षी दरवर्षी १ ते ५ जानेवारीपर्यंत चालतो. या वर्षी ३ जानेवारीची रात्र आणि ४ तारखेची पहाट हा कालावधी हा उल्कावर्षाव बघण्यास अतिशय उत्तम आहे मध्यरात्रीनंतर अंधारलेल्या ठिका
णावरून सर्वोत्तम दृश्य असेल. बुटेस नक्षत्रातून उल्का बाहेर पडतील, परंतु आकाशात कुठेही दिसू शकतात.Lyrids उल्कावर्षाव. बघण्यासासाठी यावर्षी २२ आणि २३ एप्रिल हे दिवस सर्वोत्तम आहेत दरवषी १६ ते २५ एप्रिल दरम्यान हा उल्कावर्षाव होतो हा उल्कावर्षाव धूमकेतू C/1861 G1 थॅचरने मागे सोडलेल्या धुळीच्यकणांमुळे निर्माण होतो या धूमकेतचा शोध , १८६१ मध्ये लागला होता.या उल्का कधी कधी चमकदार धुळीच्या खुणा तयार
करू शकतात जे कित्येक सेकंद टिकतात. त्यामुळे निर्माण होणारे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते हा उल्का वर्षाव वर्षभरात होणाऱ्या उल्कवर्षावांचा विचार करता मध्यम श्रेणीत येऊ शकेल असा उल्काववर्षाव आहे
Eta Aquarids उल्कावर्षाव बघण्यासाठी य यावर्षी ६ आणि ७ मे हे दोन दिवस उत्तम आहेत . हा उल्कावर्षाव सुप्रसिद्ध हॅलेच्या धूमकेतूमुळे होतो . हा उल्का वर्षाव वर्षभरात होणाऱ्या उल्कवर्षावांचा विचार करता ऊत्तम श्रेणीत येऊ शकेल असा उल्काववर्षाव आहे या उल्कावर्षावात दक्षिण गोलार्धात तशी ६० उल्का तर उत्तर गोलार्धात तशी ३० पर्यंत उल्का दिसू शकतात हा उल्कावर्षाव कुंभ राशीतून होतो Delta Aquarids हा उल्कावर्षाव यावर्षी २८ आणि २९ जुलै हे दोन दिवस उत्तम आहे दरवर्षी कुंभ राशीतून १२ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान हा उल्काववर्षाव होतो हा उल्कावर्षाव मार्सडेन आणि क्रॅच या खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेल्या आणि त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या धूमकेतूमुळे होतो वर्षभरात होणाऱ्या उल्कावर्षावाचा विचार करता हा उल्कवर्षाव माध्यम श्रेणीत मोडणारा उल्कावर्षाव आहे ज्यामध्ये तशी २० उल्का दिसू शकतील .पर्सीड्स उल्काव
र्षाव यावर्षी १२ आणि १३ ऑगस्ट रोजी सर्वोत्तम स्थितीत दिसेल वर्षभर होणाऱ्या उल्कावर्षावाचा विचार करता हा उल्कावर्षाव सर्वोत्तम श्रेणीत मोडता येऊ शकतो या उल्कवर्षावात तासी ८०पर्यंत उल्का दिसू शकतात हा उल्का वर्षाव स्फीट टटल या धूमकेतूमुळेदरवषी १७ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान होतो आपल्याकडे हा पावसाचा कालावधी असल्याने याची मजा आपल्याला पुरेशी घेता येत नाहीड्रॅकोनिड्स उल्कावर्षाव वर्षभर होणाऱ्या उल्कावर्षावाचा विचार करता किरकोळ या श्रेणीत हा उल्कावर्षाव आहे ज्यामध्ये फक्त तासी १०उल्का पडतात 21P Giacobini Zinner या धूमकेतूने द्वारे मागे सोडलेल्या धुळीच्या
कणांद्वारे त्याची निर्मिती केली जाते,. ६ ते १० ऑक्टोबर मध्ये दरवषी हा उल्का वर्षाव होतो यावर्षी या उलवर्षावाची सगळ्यात सगळ्यात चांगली स्थिती ७ ऑक्टोबर रोजी आहे
ओरिओनिड्स हा मध्यमश्रेणीतील उल्कावर्षाव आहे ज्यामध्ये तासी २० पर्यंत उल्का दिसू शकते . हा उल्कावर्षाव सुप्रसिद्ध धूमकेतू, हॅलेच्या धूमकेतूमुळे होतो दरवर्षी 2 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत हा उल्कावर्षाव होतो टॉरिड्स हा दीर्घकाळ चालणारा किरकोळ उल्कावर्षाव आहेज्यामध्ये तासी ५ ते १० उल्का दिसतात . दरवर्षी 7 सप्टेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत हा उल्का वर्षाव होतो यावर्षी या वर्षी 4 नोव्हेंबरच्या रात्री आणि 5 तारखेच्या पहाटे याची सर्वोत्तम अवस्था आहे हा उल्कावर्षाव का होतो याबाबत दोन मतप्रवाह आहेत एका मतानुसार 2004 TG10 या लघुग्रहामुळे तर दुसऱ्या मतानुसार तू 2P Encke या धूमकेतूमुळे हा उल्कावर्षाव होतो
लिओनिड्स उल्कावर्षाव. बघण्याची सर्वोत्तम वेळ १७ आणि १८ नोव्हेंबर आहे सिंह राशीतून होणार हा मध्यम किंवा किरकोळ श्रेणीत मोडणारा उल्कावर्षाव आहे ज्यामध्ये दर तासाला १५ उल्का पडतात हाउल्का वर्षाव दर ३३ वर्षांनी उत्तम स्थितीत येतो जेव्हा हा उलवर्षाव उत्तम स्थितीत असतो तेव्हा तासी १०० हुन अधिक वेगाने उल्कावर्षाव होतो या आधी २००१ साली तो सर्वोत्तम दिसला होता टेम्पल टटल या धूमकेतू मुळे ६ ते ३० नोव्हेंबर रोजी हा उल्कावर्षाव होतो
उल्कावर्षावाचा राजा म्हणता येईल अशा उलकवर्षाव वर्षाच्या शेवटी बघता येईल जेमिनिड्स , उल्कावर्षावात सर्वोत्तम अवस्थेत प्रति तास १२० बहुरंगी उल्का पाडण्याचा इतिहास आहे यावर्षी हि अवस्था १३ आणि १४ डिसेंबर रोजी गाठली जाईल मिथुन राशीच्या पार्श्वभूमीवर हा उल्का वर्षाव होईल . १९८२ मध्ये शोधलेल्या ३२०० Phaethon नावाच्या लघुग्रहामुळे हा उल्कावर्षाव होतो दरवर्षी ७ ते १७ सप्टेंबर पर्यंत हा उल्काववर्षाव होतो
वर्षाची अखेर उर्सिड्स या किरकोळ उल्कावर्षावाने होईल आहे ज्यामध्ये तासी ५ ते १० उल्का पडतील दरवर्षी१७
२५ डिसेंबर या कालावधीत हा उल्का वर्षाव होतो या वर्षी 21 तारखेच्या रात्री आणि 22 तारखेच्या पाहते हा उलवर्षाव सर्वोत्तम असेल
मागच्या वर्षी सी २०२१एस ३ , आणि 12P/Pons–Brooks तसेच C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) हे धूमकेतू दिसले होते या वर्षी आपणस एकही धूमकेतू दिसणार नाहीये
वर्षांवर्षी बघून सुद्धा ज्या विषयीचे कुतूहल आणि भीती अजून देखील कमी होत आंही अश्या ग्रहणाचा विकव्हर करता तीन ग्रहणे आपणास यावेळी बघता येणार आहेत त्यातील २ खग्रास चंद्रहंगरसाहाने असून एक खंडग्रास सुरुग्रहण आहे मागच्या वर्षी २०२४ ला चार ग्रहणे झाली होती ज्यातील एकही आपणास डोसले नव्हते यावेळी मात्र असे नाहीये निसर्गदेवता आपल्यावर प्रसन्न झाली आहे एक चंद्रगहाण आपल्याला दिसणार आहे ८ सप्टेबर रोजी होणारे चंद्रग्रहण आपणस दिसणार आहे तर १४ मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण आपणस बघायचे असल्यास उत्तर अमेरिका मध्य अमेरिका दक्षिण अमेरिका या खंडाची वाट धारावी लागणार आहे वर्षातील एकमेव सूर्यग्रहण युरोप खंडाचा उत्तरेकडील भाग ग्रीनलंड या भागातून दिसणार आहे
हौशी अवकाश प्रेमींचा विचार करता धूमकेतू आणि ग्रहणाच्या खालोखाल ज्याचे आकर्षण असते ती गोष्ट म्हणजे विविध ग्रहांचेर दर्शन या २०२५ वर्षी त्याची काहीशी चंगळ म्हणता येईल अशी स्थिती आहे हे बघताना आपणास क्षितीज म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे तर मित्रानो आपण मोकळ्या मैदानात उभे असताना ज्याठिकणी आपणस जमीन आणि अवाक्ष एकत्र झालेले दिसते त्यास क्षितिज म्हणतात आता बघूया या वर्षातील अवाक्ष प्रेमींच्या चांगलीकडे पहिल्यांदा बुध बघूया
बुध ग्रह ८ मार्च रोजी आणि १९ ऑगस्ट रोजी तसेच १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिमेच्या आकाशात क्षितीजाच्या सर्वोच्च उंच ठिकाणी डिसेंरल त्यानंतर १० एप्रिल रोजीआणि ४ जुलै रोजी तो सूर्योदयाच्या आधी पूर्वेला उत्तम दिसेल
शूक्र ग्रह बघण्याची पहिली वेळ वर्षाच्या सुरवातीलाच आहे १० जानेवारीला पश्चिम दिशेला क्षितीजाच्या सर्वोच अनुनच स्थानी सूर्यस्तानांतर लगेच दिसेल तर ३१ मी रोजी शुक्र ग्रह पहाटेच्या आकाशात पूर्व दिशेला क्षितीजाच्या सर्वोच स्थानी दिसेल
मंगळ १६ जानेवारी रोजी आकाशातील सर्वात ठळक बाब म्हणजे मंगल असेल तर शनी १९ सप्टेबर रोजी उत्तम डिसेंरल गुरु ग्रहाचे दर्शन करण्यासाठी या वर्षात विशेष असा दिवस नाहीये तर युरेनस नेपच्यून हे ग्रह सध्या डोळ्याने दिसू शकत नसल्याने त्याची माहिती देत नाहीये
एकंदरीत हे वर्ष खगोल प्रेमींसाठी खुप काही देणारे आहे हे नक्की



Comments
Post a Comment