'मना त्वाची पूर्वसंचित रे केले,
'जनीं सर्वसूखीं असा कोण आहे ।
विचारें मना तूंचि शोधुनि पाहे ॥
मना त्वाची पूर्वसंचित रे केले !
तया सारिखे भोगणे प्राप्त झाले'!
समर्थ रामदास स्वामी यांच्या सुप्रसिद्ध अश्या मनाच्या श्लोकातील ११ व्या क्रमांकाचा श्लोक . या जगात पूर्णपणे सुखी असा कोणीही नाही, हे तू स्वतःच मनाला विचार करून शोधून पाहिले पाहिले पाहिजे. हे मना, तू स्वतःच पूर्वजन्मी जशी कर्मे केली आहेत, त्यानुसारच तुला फळे व सुख-दुःख भोगावी लागत आहेत अशा या श्लोकाचा अर्थ .सध्याच्या दुष्काळ सदृश्य स्थितीचा विचार करता श्लोकाचा खालचा अर्धा भाग विशेष महत्ताचा आहे. मना त्वाची पूर्वसंचित रे केले! तया सारिखे भोगणे प्राप्त झाले'! गेल्या काही वर्षात आपण सामूहिकरित्या दाखवलेली बेफिकीरीची शिक्षा आपण सध्या पाणी टंचाईच्या माध्यमातून अनुभवत आहोत
गेल्या ४ ते ५ वर्षात जागतिक स्तरावर हवामान बदलाच्या अनेक घटना घडल्या, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आले. काही ठिकाणी न भूतो न भविष्यती अशी थंडीची लाट आली. उष्णतेने गेल्या कित्येक वर्षाचे उच्चांक मोडले .आपला भारत त्यातही महाराष्ट्र मात्र त्यावेळी बराच निवांत होता. फारसा त्रास होत नव्हता. त्यामुळे अनेक भावनिक मुद्दे घेऊन आपण एक्मेकांकांशी छान भांडणात होतो. सम्राट हर्षवधन च्या काळात भारतात आलेला सुप्रसिद्ध चिनी प्रवाशी ह्युएन त्सांग याने आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचे जे वर्णन केले आहे की हे लोक कष्टाळू आहेत मात्र जगात काय चालू आहे या विषयी यांना काहीही माहिती नसते त्याचे आपण तंतोतंत पालन करत होतो. मात्र त्यावेळी आपण विसरलो की जगाचा काही भाग जात्यात भरडला जात असताना आपण कायम सुपात आनंदात राहणे शक्यच नाही. आपण देखील जात्यात भरडले जाणार आहोत.तरी आपण जागरूक होऊन पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीनुसार आपणाकडे अशी स्थिती अली तर काय करावेयाबाबत कार्यवाही सुरु करणे आवश्यक होते मात्र आपण गाफील राहिलो.आता नाही ना अडचण जेव्हा येईल तेव्हा बघू असे भाव मनी बाळगत हव्या तेव्हढ्या गतीने पाऊले उचलली नाहीत. ज्याचे फळ आता आपण बघतो आहोच.गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणत पाऊस झाला. अपवाद वगळता महाराष्ट्रातील सर्वच धरणे जवळपास १०० टक्के भरली. अनेक धरणे ओव्हरफ्लो झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी समुद्रात सोडून द्यावे लागले . एकंदरीत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. त्यानंतर फक्त एका वर्षाचा कालावधी झाला आहे. आज स्थिती काय आहे? अनेक ठिकाणी पाण्याचे संकट आहे.एका वर्षात स्थिती पूर्णपणे १८० अंशात फिरण्याचे कारण काय ? तर आपण या आधी केलेले काम, म्हणजे चला या वर्षी भरपूर पाणी मिळाले आहे चला देऊ उडवून पुढच्या वर्षी
पाणी मिळणारच आहे हा उद्देश मनांत ठेवत केलेली उधळपट्टी अरे या वर्षी खूप पाणी मिळाले आहे ते पुढच्या वर्षी वापरता येण्यासाठी साठवून ठेण्यासाठी काय करता येईल याचा विचार आपण केलाच नाही परिस्थिती आपल्या समोर आहे.काही जण मला हे सांगायचा संभव आहे की,अरे अजिंक्य आपल्या महाराष्ट्रातील धरणाची साठवण क्षमता फक्त एक वर्षाची गरज लक्षात घेऊन तयार केली आहे जी वर्ष संपल्याने आता पूर्ण वापरून झाली आहे त्यांना माझे सांगणे आहे की भलेही धरणांची क्षमता एका वर्षाची गरज लक्षात घेऊन केली असेल तर भूगर्भातील पाण्याचे काय ? ते देखील काही ठिकाणी चिंताजनक आहे याला कारण एकच ते म्हणजे जमिनीत पाणी साठण्यासाठी आपण केलेले दुर्लक्ष आणि मला म्हणूनच म्हणावेसे वाटते 'मना त्वाची पूर्वसंचित रे केले! तया सारिखे भोगणे प्राप्त झाले'!'


Comments
Post a Comment