नेमीची येते अवकाळी
तसे बघायला गेले तर पुणेकरांनी केलेला बदल योग्यच हे ना ? मागील गेल्या ४ ते ५ वर्षाचा आढावा घेतला तर, या वर्षात मार्च ते मे महिन्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेला आढळेल, आणि हे चक्र असेच सुरु राहणार असल्याचे अनेक हवामान तज्ज्ञ सांगत आहेच. तुम्ही जर या पावसाचे फोटो व्हिडीओ फेसबुक सारख्या सोशल मीडियावर अपलोड केले असतील, तर पुढच्या वेळी तुम्ही फेसबुक मेमरी बघताना बाहेर पाऊस पडत असेलच असे हे तज्ज्ञ सांगत आहेत.
मात्र असे असले तरी देखील या समस्येवर आपल्याकडे ठोस उपाययोजना करण्याबाबत मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ असल्याचे चित्र मला तरी दिसत आहे. आपणांस जर काही ठोस पाऊले उचलली जात असल्याचे दिसत असेल तर या लेखाच्या खाली सांगा. मला आपल्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील. असो. दरवेळी अवकाळी पावसाच्यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येते, जे योग्यच आहे. मात्र या बरोबरच अवकाळी पावसात देखील ताठ मानेने उभी राहतील अशी पिके शेतकऱ्यांच्या शेतात उभी राहतील याबाबत भरीव काही
होत नसल्याचे माझे निरीक्षण आहे. नाही म्हणायला या बाबत कृषी विद्यापीठात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. ज्यात मोठ्या प्रमाणात यश देखील मिळाले आहे. मात्र हे संशोधन देखील दुर्दैवाने अन्य संशोधनसारखे विद्यापीठाच्या आवारातच बंदिस्त आहे. ते काही केल्या माझ्या ढिनच्यॅक खुर्द , पींच्याक बुद्रूक मधील शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाहीये. ते पोहोचणे सध्याच्या काळात अत्यावश्यक आहे. कारण सध्या जगभरात अवकाळी पावसाच्या घटना वाढताना दिसत आहेत. दरवेळी अवकाळी पावसाच्या वेळी मदत देण्याचे ठरवले तर शासनाची सर्व तिजोरी त्यातच संपून जाऊ शकते. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना मदत देताना अवकळीला समर्थपणे तोंड देता येईल अशी पीक रचना देखील आपण आणायला हवी.गेल्या ४ ते ५ वर्षाचा आपण आढावा घेतल्यास अमेरिकी असेल,ब्राझील असेल ,ऑस्ट्रोलीया असेल या सारख्या अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार उडवल्याचे आपणास दिसून येते. त्यामुळे पुढच्यास ठेच मागचा शहाणा या
मराठी म्हणी प्रमाणे त्यांच्या अनुभवातून शहाणे होत, तिथे पडला तसा पाऊस आपल्याकडे पडला तरी आपण त्यातून सही सलामत बाहेर पडू यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे २ एप्रिल रोजी मी पुणे शहरात अलका टॉकीज घेतलेल्या अनुभवामुळे मला वाटते आहे. नाहीतरी आहेच म्हणायला 'नेमीची येते अवकाळी'


Comments
Post a Comment