इस्रोच्या मानाच्या शिरपेचात अजून एक तूरा

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रो दिवसोंदिवस जगाचा अधिकाधिक विश्वास संपादन करत आहे.२०२३ची जगातील सर्वोत्तम अंतराळ संशोधन संस्था म्हणून पुरस्कार मिळाल्यानंतर, तर त्यात झपाट्याने वाढच होताना दिसत आहे.  त्यामुळेच ५ डिसेंबर रोजी युरोपीय स्पेस एजन्सीच्या महत्तकांक्षी प्रोब ३चे प्रक्षेपण करण्याची  संधी इस्रोला मिळाली.जिचे सोने करत इस्रोने प्रोब३ चे यशस्वी प्रक्षेपण करत, आपली गुणवत्ता सिद्ध केली, आणि स्वत:च्या शिरपेचात मानाचा तूरा देखील रोवला. त्याबद्दल इस्रोच्या सर्व संशोधकांचे करावे तितके कौतूक कमीच आहे.इस्रोने या आधी दुसऱ्या संस्था,देश यांचे उपग्रह स्वत:च्या उपग्रह प्रक्षेपण यानातून प्रक्षेपित केलेले असले तरी आताचे आव्हान मोठे होते.प्रोब ३या मोहिमेत दोन उपग्रह हाकेच्या अंतरावर प्रक्षेपित करायचे होते.यामध्ये अत्यंत कमी काही मिलमिटरचा देखील फरक पडला असता तर मोहिम अयशस्वी ठरली असती‌,आणि कोट्यावधीचा खर्च वाया गेला असता,इस्रोच्या अभियंतांनी हे आव्हान स्विकारले आणि खरे करुन दाखवले सुद्धा. 
इस्रोमार्फत अत्यंत कमी खर्चात अंतराळ मोहिमा राबवल्या जातात. त्यामुळे अनेक देश ,संस्था आपले उपग्रह खर्च कमी करण्यासाठी इस्रोच्या माध्यमातून अवकाशात सोडतात.यातून इस्रोला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते.या चलनामुळे इस्रोला स्वत:च्या संशोधनाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळून, तीचे सरकारवरील अवलंबत्व कमी होते.सरकारला देखील तो पैसा अन्य ठिकाणी खर्च करता येतो. या अवकाश मोहिमेमध्ये सातत्याने मिळणाऱ्या यशामुळे, इ.एस.ए. या संक्षिप्त नावाने ओळखल्या जाणाऱ्या, युरोपीय स्पेस एजन्सी या युरोपीय युनियनच्या राष्ट्रांनी एकत्रपणे उभारलेल्या अवकाश संशोधन संस्थेच्या प्रोब ३ मोहिमेच्या प्रक्षेपणाची संधी इस्रोला मिळाली. जी इस्रोसाठी अत्यंत महत्तवाची बाब आहे. 
     इस्रोची सुरवात आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये उडवतो त्या प्रकारच्या मात्र आकाराने प्रचंड मोठे रॉकेट उडवून एका पडक्या वापरात नसलेल्या, चर्चमधून झाली.त्यावेळी इस्रोचे शास्त्रज्ञ,सायकलला मोळी बांधावी त्या प्रकारे सायकला रॉकेटचे भाग बांधत .विकसीत देशांनी पी.एस.एल.व्ही.चे तंत्रज्ञान देण्याचे नाकारल्यावर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी खचून न जाता स्व कष्टाने ते तंत्रज्ञान मिळवले,ते देखील अत्यंत कमी खर्चात.त्यामुळे इस्रो कमी खर्च्यात उपग्रह प्रक्षेपण करत इस्रो भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करत आहे.
       इस्रोचे हे यश समजण्यासाठी आपणास प्रोब ३ही मोहिम काय आहे,हे समजणे आवश्यक आहे.तर मित्रांनो, आपला सुर्य  मुख्यत: हायड्रोजनचा गोळा असला,तरी तो एकसंध नाहीये.सुर्यात बाहेरुन आतमध्ये गेल्यास विविध भाग आहेत. या भागांमध्ये सर्वात बाहेरचा भाग म्हणजे कोरोना होय. सौरज्वाला उसळण्यामध्ये या कोरोनाचा मोठा सहभाग असतो. या सौरज्वालांमुळे आपल्या पृथ्वीवर उपग्रहाद्वारे होणाऱ्या दळणवळणात मोठ्या प्रमाणात अडथळा होतो.हा अडथळा येवू नये, यासाठी काही उपाय करायचे असल्यास, कोरोनाचा अभ्यास महत्तवाचा ठरतो. प्रोब ३याचाच अभ्यास करत आहे. यात दोन उपग्रह आहेत जे एकमेकांपासून अक्षरश: हाकेच्या अंतरावर आहेत. सध्याच्या  तंत्रज्ञानाच्या मर्यादामुळे कोरोनाचे निरीक्षण फक्त सुर्यग्रणातच कोरोनाचा अभ्यास करता येतो.प्रोब ३मधील दोन उपग्रहांपैकी एका उपग्रहामार्फत कृत्रिम सूर्यग्रहण तयार करुन त्याद्वारे दुसऱ्या उपग्रहामार्फत कोरोनाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. या महत्तकांक्षी योजनेमध्ये स्वत:ची प्रक्षेपण यंत्रणा असून देखील खर्च कमी करण्यासाठी युरोपीय स्पेस एजन्सीने इस्रोची निवड केली.यातच इस्रोचे जागतिक महत्व स्पष्ट होते.जे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.


Comments

Popular posts from this blog

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

८० तासाला एक

खगोलातील अढळ तारा निखळला