Posts

Showing posts from April, 2025

तुम्ही शिकवाल हो‌ हिंदी !

Image
                             नुकताच आपल्या राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी हि भाषा एक विषय शिकवण्यास सुरवात करण्यात येणार असल्याचा, निर्णय घेतल्याचे एव्हाना तुम्हाला आता माहिती झाले असेलच. . या विषयावर आता वेगवेगळ्या अंगाने चर्चा सुरु आहे ज्यात उत्तरेतील राज्ये त्रिभाषा सूत्र स्वीकारतात का ?  भाषावार प्रांत  रचनेचा मूळ हेतू काय  ? हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा आहे का ?  ऊत्तर भारतीयांच्यी सोइ करण्यासाठी ही खेळी आहे . दक्षिणेकडील राज्यात अशा निर्णय घेऊन दाखवा , अश्या विविध उपविषयांच्या आधारे करण्यात येणारे दावे प्रतिदावे आरोप प्रतिआरोप करण्यात येत आहेत .मात्र या सर्व गदारोळात एका महत्वाच्या मुद्द्यावर मात्र फारच कमी बोलले जात आहे . किमान माझे तरी तसे निरीक्षण आहे तो म्हणजे ज्या मुलांना हिंदी भाषा शिकवण्याबाबत हे सर्व आकांडतांडव सुरु आहे त्यांच्या भावविश्वाचा !                                 नागरीशास्त्र...

इथेही 56

Image
विद्यमान सत्ताधिकारी वर्गाकडून या पुर्वी अनेकदा 56इंच छाती आहे आमची, असे सांगितले जात असल्याचे वाचकांना आठवत असेलच .स्व अभिमान सांगण्यासाठी वापरण्यात येणारा 56 हा आकडा सत्ताधारी वर्गाला खुपच प्रिय असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. कारण त्यांच्याकडून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार 56 टक्केच देण्यात आला आहे. मुळातच तूटपुंजा असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार  कमी केल्याने त्यांचा समोर जीवन मरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.        एसटी महामंडळाच्या या दुखण्यावर काय उपचार करायचे ? हे माहिती आहे पण राजकीय इच्छा शक्तीच्या अभावी योग्य ते उपाय होत नाहीये‌.सध्या एसटी महामंडळाला अतिशय मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. वरवरची मलमपट्टी स्वरूपात आर्थिक मदत देवून वेळ मारली जाते ती पुन्हा एकदा मदत देण्याची स्थिती येण्यापर्यत.हे चक्र भेदणे हे संकट दुर करण्यासाठी अत्यावश्यक आहे. देशातील इतर एसटी महामंडळे देत नाहीत अस्या कित्येक सवलती आपल्या महामंडळाकडून देण्यात येतात ,समाजसेवेच्या नावाखाली,जसे या सवलती देण्याचा ठेका महाराष्ट्र एसटी महामंडळानेच घेतलाय‌....

भारत बुद्धिबळातील महासत्ताच !

Image
         भारत बुद्धिबळातील महासत्ताच  ! होय,  भारत बुद्धिबळातील महासत्ता आहे,  आणि मी आंधळा देशप्रेमी म्हणून म्हणत नाहीये.  बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमन करणाऱ्या फिडे या  संघटनेतर्फे एप्रिल २०२५ मधील टॉप १०० खेळाडूंची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली त्याच्या आधारे  मी हे  विधान करतोय .       तर मित्रानो  फिडे या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या  फेडरेशन इंटरनॅशलनल डी इचेस या बुद्धिबळाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमन करणाऱ्या संस्थेमार्फत एप्रिल २०२५ च्या टॉप १००  पुरुष खेळाडूंच्या यादीतील पहिल्या १५ मध्ये ५  खेळाडू भारतीय आहेत. फिडेकडून खेळाडूंचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्या खेळाच्या प्रदर्शनावर आधारित काही गुण दिले जातात ज्याला इलो रेटिंग म्हणतात या इलो रेटिंगच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे .  या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विद्यमान विश्वविजेते ग्रँडमास्टर डी गुकेश,   चवथ्या क्रमांकावर ग्रँडमास्टर अर्जुन इरेगसी सातव्या क्रमांकावर ग्रँडमास्टर...