तुम्ही शिकवाल हो‌ हिंदी !

                     


       नुकताच आपल्या राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी हि भाषा एक विषय शिकवण्यास सुरवात करण्यात येणार असल्याचा, निर्णय घेतल्याचे एव्हाना तुम्हाला आता माहिती झाले असेलच. . या विषयावर आता वेगवेगळ्या अंगाने चर्चा सुरु आहे ज्यात उत्तरेतील राज्ये त्रिभाषा सूत्र स्वीकारतात का ?  भाषावार प्रांत  रचनेचा मूळ हेतू काय  ? हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा आहे का ?  ऊत्तर भारतीयांच्यी सोइ करण्यासाठी ही खेळी आहे . दक्षिणेकडील राज्यात अशा निर्णय घेऊन दाखवा , अश्या विविध उपविषयांच्या आधारे करण्यात येणारे दावे प्रतिदावे आरोप प्रतिआरोप करण्यात येत आहेत .मात्र या सर्व गदारोळात एका महत्वाच्या मुद्द्यावर मात्र फारच कमी बोलले जात आहे . किमान माझे तरी तसे निरीक्षण आहे तो म्हणजे ज्या मुलांना हिंदी भाषा शिकवण्याबाबत हे सर्व आकांडतांडव सुरु आहे त्यांच्या भावविश्वाचा !

                                नागरीशास्त्र ,भूगोल इतिहास या प्रमुख सामाजिक शास्त्राचे ( अर्थशास्त्रासारख्या सामाजिक शास्त्राच्या अनेक शाखा आहेत ) एकच पुस्तक विचारत घेतले तरी देखील विज्ञान,गणित आणि मराठी इंग्रजी हे भाषा विषय लक्षात घेतले तर आताच ही मुले ५ पुस्तकांचा अभ्यास करतात . आता त्यात अजून एका पुस्तकाची भर पडणार आहे . पूर्वी राज्य सरकारने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तक आणि वह्या एकत्रच देण्याच्या प्रयोग केला होता जो फसल्याने पुस्तक आणि वह्या पुन्हा वेगळ्या झाल्या . तो विचारात  घेता या निर्णयामुळे अजून एकावहीची भर मुलांच्या दप्तरात होणार आहे . वह्यांचे ओझे कमी होण्याच्या ऐवजी ते वाढणार आहे  .सरकारी काम बघता यासाठी एखादे पुस्तक येणारच हे सांगायला तज्ज्ञ व्यक्तीची सुद्धा गरज नाही त्याचे देखील ओझे मुलांना पाठीवर घ्यावे लागणार आहे या निर्णयामुळे 

                       समजा हा भाषा विषय आहे त्यामुळे या साठी  पुस्तक नसून बोलणे ऐकणे यावर भर देणारा अभ्यासक्रम असेल असे समजले तरी त्याला वेळ लागणारच ना ? शाळेच्या एका दिवसाच्या कालावधीच्या विचार करता त्यात काहींना काही  वेळ जाईल त्याचा इतर विषयांवर परिणाम होणार नाही कश्यावरुन ? बर याचे मूल्यमापन करायचे म्हणजे मुलांच्या परीक्षेचा एक दिवस वाढणार ? या वाढलेल्या परीक्षा दिवसाच्या मुलांवर ताण  येणार नाही याची हमी कशी घेणार ?व्यक्ती लहान असताना एखादी गोष्ट भाषा सहजतेने शिकू शकते हे अगदी खरे आहे मात्र या मुद्द्याच्या आधारे त्यांच्यावर हा हिंदी भाषेचा ताण कोणत्या कारणास्तव देयचा  याचा पण विचार होणे

आवश्यक आहे लहानपणी अनावश्यक मेंदूला ताण देऊन त्यामुळे  भविष्यात काही गंभीर आजार याना उदभवले तर काय करणार ? कोणतीही भाषा शिकण्यासाठी सभोवताली त्या भाषेला पूरक वातवरण असणे आवश्यक असल्याचे भाषातज्ज्ञ सांगतात आज महाराष्ट्रात हिंदीचा प्रभाव वाढत असला तरी पहिलीपासून हिंदी शुईकनाऱ्यास मुलांना पूर्णपणे मदत होईल असे वातावरण सध्यातरी महाराष्ट्रात नाहीये त्यामुळे लहान मुलांना हा नाहक त्रासच ठरण्याची शक्यता अधिक आहे 

                         या आधी कधीही राज्य शालेय शिक्षणात ( सी बी एस सी , आणि आय सी एस सी सारख्या बोर्डाचा विचार क्षणभर बाजूला ठेवूया )  पहिलीपासून हिंदी  शिकवले गेले नाहीये.  डी एड किंवा बी एड झालेल्या व्यक्तींना ज्यांना फारच कमी शाळेची सवय आहे अश्या पहिली दुसरीतील मुलाना हिंदी शिकवण्याबाबत  प्रक्षिक्षण न दिल्याची दाट शक्यता आहे .सरकारला जर पहिलीपासून हिंदी शिकवण्याची गरज वाटत असेल तर किमान दोन ते तीन वर्ष याबाबत शिक्षण देऊन तीन ते चार वर्षांनी पहिलीपासून हिंदी शिकवण्यास सुरवात करावी  आपल्याकडे

बॉलिवूडमुळे हिंदीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे माझ्यामते एखाद्या शालेय विषयाच्या पेक्षा यामुळे हिंदी सहजतेने समजते  या उलट हिंदी विषय म्हणून शिकवल्यामुळे वाढलेल्या अतिरिक्त ओझ्यामुळे तिच्याबाबत नावड निर्माण होण्याचीच शक्यता आहे तरी हा निर्णय मागे घेण्यातच लहान मुलांचे हित आहे असे आपण म्हणू  शकतो 


Comments

Popular posts from this blog

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

८० तासाला एक

खगोलातील अढळ तारा निखळला