Posts

Showing posts from August, 2024

ऑलम्पिक पदकांचा विचार करताना याही गोष्टी बघा मित्रांनो!

Image
रविवार ११ ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलम्पिक स्पर्धा संपली.या स्पर्धेत भारताची पदकतालिका मोठ्या प्रमाणात निराशाजनक दिसली.५० किलो वजनी गटात महिला कुस्तीवीर विनीता फोगट यांना सुवर्ण पदकच मिळाले,असे क्षणभर समजले तरी पदकतालिकेतील आपले स्थान फार काही उंचावत नाही‌.सुरवातीला ज्या खेलो इंडीयाचा सातत्याने उल्लेख करण्यात आला.त्याचा काहीच सकारात्मक परीणाम यावेळी झालेला दिसला नाही‌.आता या बाबत विरोधी पक्ष आणि सत्ताधिकारी पक्षाकडून वेगवेगळे दावे प्रतीदावे करण्यात येतील,त्यामुळे अनेकांचा गैरसमज होईल तो होवू नये, म्हणून आजचे लेखन तर मित्रांनो चीन अमेरिका या देशांना मोठ्या संख्येने पदके का मिळतात?,हे समजुन घेण्याआधी ऑलम्पिक स्पर्धा कशी खेळवण्यात येते, हे समजून घेणे अत्यावश्यक आहे.  स्पर्धेतील सर्व खेळ एकदाच खेळवण्यात येवून त्यातून आंतीम विजेता काढला असे होत नाही‌.तर काही खेळ वेगवेगळ्या पद्धतीने खेळवण्यात येवून स्पर्धेत रंगत वाढवली जाते.उदाहरण म्हणून आपण पोहणे हा प्रकार घेवूया .आता पोहणे फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक. ब्रेक स्ट्रोक आणि बटर फ्लाय, या चार प्रकारे करता येते‌.आता या पोहण्याचा स्पर

भारतावर दूरगामी परिणाम करणारी घटना !!!

Image
  बांगलादेशच्या   पंतप्रधान   शेख   हशिण   यांनी   देश   सोडला   असून   त्यांनी   भारतमार्गे   लंडनला   प्रयाण   केल्याचे   आपणस   एव्हाना   माहिती   झाले   असेलच .  बंगलादेशमध्ये   लष्कराच्या   मदतीने   काळजीवाहू   सरकार   स्थापन   कऱण्यात   आले   असून   पुढील   सरकार   सत्ता   स्थापन   करेपर्यंत   हे   काळजीवाहू   सरकार   सत्ता   सांभाळेलअसे   या   संदर्भात   विविध   माध्यमामध्ये   सांगण्यात   येत   आहे  .  बांगलादेशमधील   हा   सत्ता   बदल   फक्त   त्या   देशासाठीच   नव्हे   तर   आपल्या   भारतासासाठी   देखील   अत्यंत   महत्वाचा   ठरणार   आहे   .  भारतासाठीचे   बदल   आपण  तीन   प्रकारात   विभाजित   करू   शकतो .  पहिल्या   प्रकारात   आपण   ईशान्य   भारताला   विकासाच्या   मुख्य   प्रवाहात   आणण्यात ,  ईशान्य   भारताचा   उर्वरित   भारताशी   असणारा   संपर्क   वाढवण्यासंदर्भात   सध्या    सुरु   असणाऱ्या   विविध   उपाययोजना   विचारत   घेऊ   शकतो  .  दुसऱ्या   प्रकारात   आपण   भारत   आणि   बांगलादेश   यांच्यात   होणाऱ्या   व्यापार   आणि   अन्य   तरतुदींचा   विचार   करू   शकतो.तर