ऑलम्पिक पदकांचा विचार करताना याही गोष्टी बघा मित्रांनो!

रविवार ११ ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलम्पिक स्पर्धा संपली.या स्पर्धेत भारताची पदकतालिका मोठ्या प्रमाणात निराशाजनक दिसली.५० किलो वजनी गटात महिला कुस्तीवीर विनीता फोगट यांना सुवर्ण पदकच मिळाले,असे क्षणभर समजले तरी पदकतालिकेतील आपले स्थान फार काही उंचावत नाही‌.सुरवातीला ज्या खेलो इंडीयाचा सातत्याने उल्लेख करण्यात आला.त्याचा काहीच सकारात्मक परीणाम यावेळी झालेला दिसला नाही‌.आता या बाबत विरोधी पक्ष आणि सत्ताधिकारी पक्षाकडून वेगवेगळे दावे प्रतीदावे करण्यात येतील,त्यामुळे अनेकांचा गैरसमज होईल तो होवू नये, म्हणून आजचे लेखन
तर मित्रांनो चीन अमेरिका या देशांना मोठ्या संख्येने पदके का मिळतात?,हे समजुन घेण्याआधी ऑलम्पिक स्पर्धा कशी खेळवण्यात येते, हे समजून घेणे अत्यावश्यक आहे.
 स्पर्धेतील सर्व खेळ एकदाच खेळवण्यात येवून त्यातून आंतीम विजेता काढला असे होत नाही‌.तर काही खेळ वेगवेगळ्या पद्धतीने खेळवण्यात येवून स्पर्धेत रंगत वाढवली जाते.उदाहरण म्हणून आपण पोहणे हा प्रकार घेवूया .आता पोहणे फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक. ब्रेक स्ट्रोक आणि बटर फ्लाय, या चार प्रकारे करता येते‌.आता या पोहण्याचा स्पर्धेतील एका प्रकारचे पोहणारे सर्व खेळाडू एकदम  स्विमिंग पुल मध्ये उतरवून त्यातून विजेता घोषित केला जात नाही‌. तर  २००मीटर ४००मीटर ,८००मीटर पोहणे या प्रकारे अंतराचे वेगळेपण तसेच फ्री स्टाईल पद्धतीने पोहणे बॅक
 स्ट्रोक पद्धतीने पोहणे  ब्रेक स्ट्रोक पद्धतीने पोहणे आणि बटरफ्लाय पद्धतीने पोहणे या प्रकारे किती अंतर पोहावे लागणार आहे? तसेच कोणत्या प्रकारे पोहावे लागणार आहे‌? याचे तसेच सर्व अंतर एकाच प्रकारे पोहावे लागणार आहे का? याचे  जसे स्विमिंग पुलमध्ये दोन फेऱ्या मारायचा आहेत मात्र एक फेरी फ्री स्टाईल पद्धतीने पोहून पुर्ण करायची आहे तर दुसरी फेरी मात्र बॅक स्ट्रोक.पद्धतीने पुर्ण करायची आहे,या प्रकारचे वैवध्य आणले जाते. जर आपण या वैवध्याला इव्हेंट हे नाव दिले. आणि वरील सर्व कॉम्बिनेशन वापरले तर पोहणे या प्रकारातच कितीतरी  इव्हेंट तयार होतात. जसे २०० मीटर फ्री स्टाईल पोहणे, ४००मीटर बटर फ्लाय पोहणे वगैरे.
 या प्रत्येक इव्हेंटला तीन पदके मिळतात.समजा एखाद्या खेळाडूने फ्री स्टाईल आणि बॅक स्ट्रोक पद्धतीने पोहण्याचा स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.तर तो खेळाडू पोहण्याचा या वैवध्यतेमुळे सहज ४ते५  इव्हेंटमध्ये सहभागी होवून जातो. ४ते ५वेळा पोहायला मिळाल्याने त्याचा विजयाचा संधी वाढतात.पोहण्याखेरीज असी विविधता सायकलिंग आणि चालणे/पळणे या क्रीडा प्रकारात अनुभवयास मिळते‌.मात्र लेखाचा उद्देश खेळातील वैवधत्या सांगणे नसल्याने मी ती स्पष्ट करत बसणार नाही‌. असो.
    ऑलम्पिकमध्ये अनेक खेळ खेळले जातात.प्रत्येक खेळात प्रत्येक देश सहभागी होतोच असे नाही‌.जसे आपण चीनचे नाव कधीही हॉकीमध्ये ऐकत नाही.तर पोहणे,सायकलिंग सारख्या ऑलम्पिकमध्ये प्रचंड प्रमाणात पदके देणाऱ्या खेळात भारताचे कमी खेळाडु सहभागी होतात. इव्हेंटची संख्या  कमी असलेल्या भाला फेक, गोळा फेक ,कुस्ती या खेळात भारतीय खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.इव्हेंटची संख्या कमी असल्याने पोहण्याचा स्पर्धेतील खेळाडूस जसे सहज ४ते५ वेळा खेळायला मिळते.तसी काहीशी चैन आपल्या भारतीय खेळाडूंना मिळत नाही‌.जास्त वेळा खेळायला मिळत असल्याने लेखात सुरवातीला सांगितल्याप्रमाणे पोहण्याचा स्पर्धेतील खेळाडू सहजतेने एखादे पदक खिश्यात टाकतो‌.तो प्रकार भाला फेक, गोळा फेक ,कुस्ती या प्रकारचे खेळ खेळणाऱ्या खेळाडूला करणे अवघड होते,आणि नाट्य सुरु होते ते इथेच.
आपण फक्त चीन, अमेरिका या देशांनी किती पदके मिळवली, आपण किती पदके मिळवली याचे आकडे बघतो. मात्र त्यांनी कोणत्या खेळात प्रतिनिधीत्व केले,आपण कोणत्या खेळात पदके मिळवली याचा विचार करत नाही.जर या पदकांचा खेळनिहाय विचार केला तर आपणास सहजतेने लक्षात येते की, अमेरिका चीन या देशांनी मिळवलेल्या पदकांपैकी सुमारे ६० ते ६५,टक्के पदके मुळातच ऑलम्पिकमध्ये मोठ्या प्रमाणात पदके देण्यात येणाऱ्या पोहणे, सायकलिंग,चालणे/पळणे या प्रकारातील असतात.या प्रकारात भारताचे कमी खेळाडू सहभागी होतात.तर चीन अमेरिका या देशांचे खुप खेळाडू सहभागी होतात.आपले खेळाडू यात कमी असल्याने या खेळात आपली पदक मिळवण्याची शक्यता कमीच होते. तर मुळात पदकांची संख्या कमी असलेल्या भाला फेक,गोळा फेक,कुस्ती स्पर्धेसाठी आपण आपले कसब पणाला लावतो.माझ्यामते आपण जर थोडी मेहनत घेवून पोहणे, सायकलिंग,चालणे/पळणे
या खेळात उतरल्यास आपला पदकांचा दुष्काळ नक्कीच काही प्रमाणात संपेल.

Comments

Popular posts from this blog

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?