Posts

देशातील बदलते सार्वजनिक परिवहन विश्व आणि आपली एसटी

Image
       सध्या देशातील परिवहन व्यवस्था वेगाने कात टाकत आहे.तामिळनाडु कर्नाटक सारखी मोठी आणि प्रगत राज्येच नव्हे तर हिमाचल प्रदेश सारख्या काहीस्या छोट्याशा राज्यातील सार्वजनिक परिवहन सेवा देखील अधिक आरामदायी प्रवाश्यांना हिताचा विचार करणारी सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे इंटरनेटवर या संदर्भात माहिती घेतल्यास सहजतेने दिसून येते.      कर्नाटक तेलंगणा सारखी राज्ये अंबारी ऐरावत या ब्रँडनेमखाली अत्यंत आरामदायी सेवा ते देखील विविध मार्गांवर देत आहेत.गुजरात राज्याने देखील गेल्या काही महिन्यांत आपल्या सेवेचा दर्जा खुपचं उंचावला आहे. गुजरात राज्याने सर्वसाधारण प्रवाश्यांचा विचार करत आपल्या सर्वसाधारण प्रवाशी गाड्यांमध्ये पुर्वीपेक्षा अधिक आरामदायी आसने पुरवली आहेत बसमधील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी त्यांनी पुर्वीची ३बाय २ची आसनव्यवस्था मोडीत काढत २बाय २ची आसन व्यवस्था सुरु केली आहे. आपल्या एकुण बसेसपैकी जवळपास 50 टक्के बसेस इलेक्ट्रिक साधनांवर चालवण्याचा चंग बांधणारे गोवा हे राज्य असो किंवा अंबारी सारखी भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात ल...

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

Image
        आपल्या महाराष्ट्राची खरी जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते.ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक मुलींचे शिक्षण निव्वळ एसटीमुळे सुरु आहे.असे म्हटल्यास वावगे ठरू नये,असि स्थिती आहे.अनेक खेडेगावातील,वस्ती, पांडे यात राहणारे पालक एसटीची सेवा आहे,म्हणून राहण्याचा ठिकाणाहून अन्य ठिकाणी शिकायला पाठवतात. जर एसटी बससेवा नसेल तर हे पालक खासगी वाहतूकदारांच्या भरवस्यावर त्यांना शिकायला पाठवणार नाहीत हे नाकारण्यात काही अर्थ नाही. एसटी विद्यार्थ्यांना भांड्यात सुट देते जी खासगी वाहतूकदार कदापी देणार नाहीत. तसेच ज्या ठिकाणाहून एखादं दुसराच प्रवाशी मिळतो अस्या ठिकाणाहून सुद्धा खासगी वाहतूकदार आपली सेवा देणार नाहीत, तसेच एसटी मात्र लोकसेवेच्या आपल्या ब्रीदवाक्यामुळे प्रसंगी तोटा सहन करत या ठिकाणाहून देखील आपली सेवा देते त्यामुळे एसटी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे.          मात्र मात्र ही महाराष्ट्राची जीवनदायिनी बंद करण्याचे शासनाचे प्रयोजन तर नाही ना ?असे वाटावे अस्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या. सर्वसामान्य लोकांची लालपरीसुद्धा खासगी ...

भारत अमेरिका मैत्रीचा नवा सेतू बांधणार ?

Image
        भारत अमेरिका मैत्रीचा नवा सेतू बांधणार ? हा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे १० नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत    होणारी भारत अमेरिका यांच्यात झालेली चर्चा .  या चर्चेत भारतातर्फे सरंक्षण मंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस एस . जयशंकर यांनी तर अमेरिकेतर्फे त्यांचे डिफेन्स सेक्रटरी लॉयड ऑस्टिन आणि फॉरेन सेक्रटरी   अँटोनी ब्लिंकन , यांनी प्रतिनिधित्व करतील. . अमेरिकेत अध्यक्षाला मदत करण्यासाठी सेक्रटरी असतात जे आपल्या केंद्रीय मंत्र्याच्या समकक्ष असतात त्या अर्थाने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री आणि सरंक्षण मंत्र्यांनी यावेळी हजेरी लावली असे म्हटल्यास वावगे ठरू नये . कोणत्याही दोन देशांच्या राजनैतिक संबंधांच्या विचार करता या प्रकारच्या बैठकीस २ + २ बैठक ( टू प्लस टू मिटींग्स ) म्हणतात आपला भारत या प्रकारच्या   टू प्लस टू मिटींग्स जगात जपान अमेरिका या प्रकारच्या   ठराविक देशांबरोबर   घेतो १० नोव्हेंबरला होणारी हि अमेरिकेबरोब...