Posts

Showing posts from January, 2026

महाराष्ट्राने गमवला एक अष्टपैलू हिरा

Image
माझी २८ जानेवारीची सकाळ उजाडली ती एका धक्कादायक बातमीने. सकाळी ऑफिसाठी तयार होत बसस्टॉपवर बसची वाट बघत असताना,एका जवळच्या मित्राचा फोन आला. मित्राने त्याने  ऐकलेल्या एका बातमीचा खरेपणा समजून घेण्यासाठी फोन केला होता. बातमी होती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची.  फोन केल्यावर बातमी खरी आहे का, हे बघण्यासाठी न्युज चॅनल चे युट्यूब चॅनेल बघितल्यावर दुर्देवाने ती खरी असल्याचे समजले आणि  मी राष्ट्रवादीचा समर्थक नसलो तरी वाईट वाटले   स्व पक्षातील असो किंवा विरोधक सर्वच जणांशी त्यांच्या दांणगा जनसंपर्क होता.‌जनतेसाठी ते कायम उपलब्ध असायचे. त्यांचा दिवस भल्या पहाटे सुरु होयचा.सरकारी अधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामन्य जनता यांच्याशी भेटायला ते पहाटे सहापासून  सुरूवात करायचे.   अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून कारकिर्द अत्यंत धाडसी, निर्णयक्षम आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेली म्हणून ओळखली जाईल. विक्रमी पाच वेळा उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भुषवले‌‌. संघटनात्मक कौशल्य, जलद विकासकामे आणि कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे दादा 'ॲक्शन-ओ...

क्वांटम तंत्रज्ञान : भविष्यातील जगाची किल्ली

Image
    सध्याचे   जग   हे   तंत्रज्ञांचे   म्हणायला   सुरवात   होऊन   आता   सुमारे   अडीच   पिढ्यांचा   काळ   उलटून   गेला   आहे  .  आताचे   जग   आहे   क्वांटम   तंत्रज्ञानाचे . २१   व्या     शतकातील   विज्ञानतंत्रज्ञान   क्षेत्राचे   चित्र   पूर्णतः   बदलवून   टाकणारा   शोध   म्हणजे  क्वांटम फिजिक्स    नेहमीच्या   कम्पुटरच्या   मर्यादा   ओलांडणारी   ही   संकल्पना   प्रत्यक्षात   आणण्यासाठी   अनेक   शास्त्रज्ञांनी   अनेक   वर्ष    प्रयत्न   केले    या   शास्त्रज्ञांमध्ये   प्रामुख्याने   नाव   घ्यावेच    लागेल   ते   म्हणजे   जॉन   क्लार्क ,  मिशेल   एच .  डेवोरेट   आणि   जॉन   एम .  मार्टिनिस .  यांचे   नाव   घ्यावेच   ला...