Posts

Showing posts from October, 2025

अशी झाली मानवाच्या अंतराळ प्रवासाची सुरुवात

Image
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी पृथ्वीवर मानव करत असलेल्या निसर्गाच्या हानीमुळे मानवाला नजीकच्या भविष्यकाळात आपला मुक्काम पृथ्वी सोडून अन्य ग्रहावर किंवा किमान अंतराळ स्थानकावर काढावा लागेल, असे विधान केले होते. तसेच मानवाला आवश्यक असणाऱ्या अनेक धातूंचा साठा पृथ्वीवर तर इतर ग्रहावर मोठ्या प्रमाणात असल्याने तो पृथ्वीवर आणणे सोपे व्हावे, यासाठी अंतराळात मानवाला सहजतेने राहता यावे, यासाठी काय करता येईल? अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणाचा मानवावर काय परिणाम होईल? याचा अभ्यास विसाव्या शतकाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात सुरू झाला. रशियाचे मीर अवकाश स्थानक, अमेरिकेचे स्काय लॅब हे अंतराळ स्थानक असो, किंवा सध्या वापरात असलेले आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक असो, किंवा आता वेगाने आकारास येणारे चीनचे अवकाश स्थानक असो, किंवा भारताकडून अंतराळ स्थानक उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना — हे त्यातीलच काही महत्त्वाचे टप्पे. मानवाची अंतराळात थेट वस्ती करण्यासाठीच्या उपाययोजना जरी २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या असल्या तरी यामागच्या कल्पनेचा मोठा इतिहास ...