खगोलातील अढळ तारा निखळला
खगोलशास्त्रप्रेमींची मंगळवार 20 मेची सकाळ उजाडली,ती एका दुर्देवी बातमीने. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाच्या बातमीने खगोलशास्त्रप्रेमींना त्यातही मराठी जनांना आपल्यातीलच कोणीतरी भावना दाटून आली. जगविख्यात शास्त्रज्ञ असून देखील आलेल्या पत्रांना आवर्जून उत्तर देणारे व्यक्तीमत्व म्हणून डॉ. नारळीकर विख्यात होते.डॉ. नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. पालकांच्या या ज्ञानाचा प्रभाव बालपणी डॉ जयंत नारळीकरांवर पडला.नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार ...