स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे!
आपल्या भारताच्या संविधानाने कलम १९ नुसार आपल्यला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. मात्र हे स्वातंत्र्य अनिर्बध दिलेले नाही तर त्यावर काही बंधने दिलेली आहेत जी शासन परिस्थिनुसार वाढवू अथवा कमी करू शकते आपल्या लोकशाहीतील काळा अध्याय असलेल्या आणीबाणीत आपण त्याच्या अनुभव घेतलेलाच आहे आपण सध्या देखील आणीबाणी नसताना ही बंधने लक्षात घेतली पाहिजे आपण घटनेने दिलेले स्वातंत्र्य उपभोगताना हे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याची जाण ठेवणे अत्यावश्यक आहे तरच आपण देशाचे जवाबदार नागरिक म्हणायला लायक ठरू हे सर्व सांगायचे कारण म्हणजे युट्युब या सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला एक टॅलेन्ट हंट कार्यक्रम या कार्यक्रमात विनोद सादर करताना अत्यंत अयोग्य भाषेचा वापर केला गेला असल्याने मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला आहे आसाम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून या कार्यक्रमांच्या निर्मात्यांच्या विरोधात पोलिसी कारवाई सुरु करण्यात आलेली आहे यावरून या घटनेचे गांभीर्य लक्षात येईल पुस्तके किंवा पारंपरिक टीव्हीला काही मर...