महाराष्ट्राच्या एसटीने गमावलेली संधी
नुकतीच आपल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 15 टक्के वाढ करण्यात आली सन 2021 पासून तिकीट दरात वाढ न केल्याचे कारण या निमित्तने देण्यात आले. एसटी महामंडळाचे उत्पन्नाचा मुख्य साधन असणाऱ्या तिकीटांचे दर आणि वाढलेले अन्य खर्च बघता या समतोल साधण्यासाठी तिकिटाचे दर वाढवणे आवश्यकच होते असेही याबाबत सांगण्यात आले. मात्र या वाढलेल्या तिकीट दरांमुळे महाराष्ट्र एसटीने एक मोठी संधी मात्र गमावलेली आहे हे नाकारता येत नाही ती संधी म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आपला विस्तार करण्याची, आणि या विस्तारातून आपला नफा अधिकाधिक वाढवण्याची .आपल्या शेजारील कर्नाटक राज्य हे त्यांच्या प्रादेशिक सीमांचा बाहेर मोठ्या प्रमाणात सेवा देत आपला नफा कमवते मात्र मात्र आपल्या महाराष्ट्र एस टी मध्ये 15 टक्के दरवाढ झाल्याने आपली ती संधी हूकलेली आहे हे सत्य स्वीकारायलाच हवे.. आपल्या भारतातील सर्व एस टी महामंडळाची एक शिखर संस्था आहे ऑल ऑल स्टेट रोड ट्रान्सपोर्ट युनियन नावाची या ट्रान्सपोर्ट युनियनच्या नियमानुसार आंतरराज्य एसटी बस वाहतुकीचे नियमन होते या नियमानुसार एखाद्या राज्याला...