सिंहावलोकन २०२३ भारतीयांचे आनंदाचे, चिंतनाचे, शरमेचे ,अभिमानाचे क्षण


सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने  कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता  ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात भारतातीयांचे सरत्या वर्षातील आनंदाचे, चिंतनाचे, शरमेचे ,अभिमानाचे क्षण बघूया घडामोडी बघूया
         सरत्या 2023या वर्षात शरमेच्या क्षणाचा विचार करायचा झाल्यास वर्षाच्या अखेरीस झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशनाच्या उल्लेख करता येईल.जगातील सर्वात मोठी लोकशाही असी जगात ओळख असलेल्या आपल्या भारतात एकाच अधिवेशनात तब्बल संसदेचे दोन्ही सदन मिळून तब्बल 142 खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले. ज्यात सर्वच्या सर्व विरोधी पक्षाचे होते. आपल्या संसदीय इतिहासात  डॉ.मनमोहनसिंग सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात (2009ते 2014) अखेरच्या काही संसदीय अधिवेशनात विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गदारोळ केला होता त्यावेळेचे विरोधक आताचे सत्ताधारी आहेत‌. तर त्यावेळेचे सत्ताधिकारी विद्यमान  विरोधक आहेत.
त्यावेळी विरोधकांनी भष्ट्राचाराच्या मुद्द्यांवर संसदेत अभुतपुर्व गोंधळ घातला मात्र त्यावेळच्या विरोधकांना सत्तेत येताच भष्ट्राचाराचा आरोप असणाऱ्या व्यक्तींना निर्दोष सोडणे भाग पडले. डॉ मनमोहनसिंग यांनी सत्तेत असताना विरोधकांवर सुडाने कार्यवाही केली नाही. संसदेतील विरोधकांचे महत्व त्यांनी जपले. मात्र ती उज्वल परंपरा सरत्या वर्षात पार धुळीला मिळाली.संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर न देता सरकार पक्षाकडून त्यांना निलंबित करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले.जी माझ्यामते भारतीयांसाठी शरमेची गोष्ट आहे.
      सरत्या 2023 या वर्षात चिंता वाटावी अस्या घटनेचा विचार करता विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचा वाढत्या घटनेचा विचार करावा लागेल. शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुविख्यात असणाऱ्या कोटा शहरात स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या  आत्महत्येच्या वाढत्या घटनांनी तणावाची चिंतनाची स्थिती निर्माण केली. अखेर कोटाच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोटा शहरातील कोणत्याही क्लासने दोन महिने कोणत्याही परीक्षा घेवू नयेत .क्लासमधील विद्यार्थी तणावात दिसल्यास प्रशासनास कळवण्याचे आदेश काढावे लागले. सरत्या वर्षात 4डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या 2022च्या गुन्ह्यांविषयी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने ही गरज अधोरेखितच केली. या खेरीज चारधाम यात्रा सुलभ व्हावी या हेतूने करण्यात येणाऱ्या रस्ते कामाच्या दरम्यान उत्तरकाशी जिल्ह्यात एका बोगद्यात 41 मजूर अडकल्याने आणि त्यांना बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याने भारतीयांचा काळजाचा ठोका चूकला.प्रचंड प्रयत्न केल्यावर अखेर त्यांची सुटका झाली.
सरत्या वर्षात भारतीयांना अनुभवलेल्या आनंदाच्या आणि अभिमानाच्या गोष्टींबाबत बोलायचे झाल्यास चांद्रयान 3,, आदित्य एल 1 या अंतराळ मोहिमा यशस्वी होणे तसेच गगनयान या महत्ताकांक्षी अवकाश मोहिमेच्या निश्चित केलेल्या विविध टप्प्यांवर अपेक्षित असे यश मिळणे तसेच जी 20मध्ये भारताच्या पुढाकाराने झालेला आफ्रिकी महासंघाचा पुर्णवेळ सदस्य या नात्याने झालेला प्रवेश याबाबी प्रामुख्याने सांगता येतील.चांद्रयान3 ही मोहिम आतापर्यंतचा विविध मोहिमांमध्ये चंद्राचा जो हिस्सा मानवाच्या अभ्यासातून सुटला होता,त्या चंद्राच्या अप्रकाशित बाजूवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात (,अचूकपणे बोलायचे झाल्यास 68अंश दक्षिण अक्षवृत्त)आखण्यात आलेली होती.यामुळे समस्त मानवजातीस चंद्राविषयीची नविन माहिती समजली.आदित्य एल 1 ही अवकाश मोहीम सुर्याचा अभ्यास करण्यासाठी आखण्यात आलेली मोहिम आहे‌ सुर्यापासून निघालेल्या सौरवाताचा परिणाम आपल्या उपग्रह संदेशवहणासह, पृथ्वीच्या हवामानावर देखील परिणाम होत असल्याने, तसेच मंगळावरील जीवसृष्टी नष्ट होण्यामागे सौरवात हे एक कारण असू शकते असे शास्त्रज्ञांचे मत असल्याने सौरवाताचा अभ्यास आवश्यक आहे.त्यामुळे
फक्त भारतीयांसाठीच नव्हे तर समस्त जगासाठी आदित्य एल वन ही मोहिम आवश्यक आहे. गगनयान मोहिमेच्या तयारीतील काही महत्त्वाचे टप्पे या वर्षी पुर्ण करण्यात आले.त्यामुळे चांगली सुरुवात म्हणजे मोहिम फत्ते या वाक्प्रचारानुसार या टप्प्यावर मिळालेल्या यशाबाबत समस्त भारतीयांना आनंदाचे वाटावे असाच हा क्षण आहे.अवकाशात सोडलेली कुपी  पुन्हा पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणणे, गगनयान वापरण्यात येणाऱ्या अवकाश यानाची यशस्वी चाचणी करणे आदी मोहिमा यावर्षी पुर्ण करण्यात आल्या.गेल्या कित्येक वर्षांपासून फक्त चर्चेचा विषय असलेल्या मात्र कार्यवाही न होणारा जी 20 घ्या अधिवेशनातील विषय म्हणजे आफ्रिकी महासंघाचा सदस्य देश म्हणून जी 20मध्ये समावेश करणे हा होय. यावर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी 20,घ्या अधिवेशनात भारताचा पाठपुराव्यामुळे अखेर हा प्रश्न मार्गी लागला आणि आफ्रिका महासंघाचा युरोपीय युनियनच्या धर्तीवर सदस्य म्हणून जी 20मध्ये समावेश करण्यात आला.अनेक वर्ष केवळ चर्चा होणारा प्रश्न भारतामुळे मार्गी लागणे भारतीयांसाठी अभिमानाचीच गोष्ट आहे.
एकंदरीत हे वर्ष भारतासाठी काही शरमेचे, चिंतेचे, तणावाचे आनंदाचे अभिमानाचे क्षण देणारे संमिश्र ठरले असेच म्हणावे लागेल.

सरत्या वर्षात भारताचा विविध जागतिक परिषदांमध्ये कश्या प्रकारचा सहभाग राहिला हे जाणून घेण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

सरत्या वर्षात भारतावर कोणकोणत्या नैसर्गिक आपत्ती आल्या हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

सरत्या वर्षात भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत काय बदल झाले हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 


सरत्या वर्षात भारताचे शेजारी देशांशी संबंध कसे राहिले हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

सरत्या वर्षातभारताच्या क्रीडाविश्वात काय घडले ते जाणून घेण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

सरत्या वर्षात भारताचे सार्क देश वगळून अन्य देशांशी राजनैतिक संबंध कसे होते हे जाणून घेण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

 


Comments

Popular posts from this blog

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?