सिंहावलोकन २०२३ भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

       


  सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता  ग्रेनीयन कॅलेंडर वर्षच सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात भारतात आलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था क्षेत्रातील घडामोडी बघूया

   गेल्या वर्षासारखेच या वर्षी वंदे भारत एक्स्प्रेस चर्चेत राहिली.मागच्या वर्षासारखेच याही वर्षी अनेक वंदे भारत एक्स्प्रेसच्या अनेक सेवा  सुरु करण्यात आली.वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये फक्त बसून प्रवास करण्याची सोय असल्याने स्लीपर बर्थ असणारी सुद्धा वंदे भारत असावी याबाबत या वर्षी खुप चर्चा झाली .वर्षाच्या अखेरीस काही वंदे भारत मध्ये प्रायोगिक तत्वावर स्लिपरची सोय असणारे डब्बे जोडण्यात आले.तसेच सर्वसामान्यांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी वंदे भारतचे सर्वसामान्य जनतेला परवडेल असे प्रारुप आणण्याबाबत या वर्षी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली..चर्चेच्यावेळी वंदे साधरण असे नामकरण करण्यात आलेल्या या प्रकाराचे रेल्वेकडून अमृत भारत असे अधिकृत नामकरण करण्यात आले.या गाडीच्या प्रायोगिक चाचण्या यावेळी सुरु आहेत.

वंदे भारत खेरीज रेल्वेच्या मालवाहतूकीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला महत्ताकांक्षी  डेडीकेडडेट फ्रेड फ्री कॉरिडॉर यावर्षी मोठ्या प्रमाणात पुर्ण करण्यात आला .सध्या ज्या प्रमाणात या विषयी काम चालू आहे,ते बघता पुढील 2024 या वर्षी मार्च ते एप्रिल दरम्यान  ईस्टन डेडीकेडडेट फ्रेड फ्री कॉरिडॉर आणि वेस्टर्न डेडीकेडडेट फ्रेड फ्री कॉरिडॉर हे दोन्ही पुर्ण क्षमतेने सुरू होतील.

या खेरीज मराठवाड्यातील रेल्वेचे यावर्षी मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण करण्यात आले.आता मराठवाड्यातील खुपच कमी रेल्वेमार्गावर डिझेल इंजिन वापरण्यात येते.तसेच या वर्षी काश्मिरमध्ये रेल्वे धावण्याचा प्रकल्पातील

महत्त्वाचा भाग असलेल्या उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक या प्रकल्पातील अनेक अवघड टप्पे या वर्षी पुर्ण करण्यात आले. मात्र ईशान्य भारतातील राज्यांमध्ये रेल्वे नेण्याचा प्रकल्प मात्र या वर्षी काहीसे रेंगाळले.त्यातील काहीच टप्पे ठरलेल्या मुदतीत पुर्ण झाले.बहुतेक प्रकल्प उशीराने सुरु आहेत.

रेल्वेप्रमाणेच भारतात सार्वजनिक बससेवा देखील मोठ्या प्रमाणात वापरली जाते‌.सार्वजनिक एसटीला सर्वसाधारणपणे एसटी असे संबोधतात.तर या एसटीबाबत अनेक घडामोडी घडल्या. त्यामध्ये महाराष्ट्राच्या एसटीमध्ये पुर्णतः स्लीपर प्रकारच्या बसेस सुरु करणे.एशियाड(सरकारी नाव हिरकणी)बस अधिक आकर्षक स्वरुपात आणि सोइसवलतीसह रुजू करणे, इलेक्ट्रिक बसेसचा वापर वाढवणे, इलेक्ट्रिक बसची सेवा शिवाई आणि  शिवनेरी या ब्रँडनेम अंतर्गत सुरू करण्यात आली. नॉर्थ ईस्ट कर्नाटक ट्रान्सपोर्टची आरामदायी बससेवा असलेल्या राजरथ या ब्रँडनेम अंतर्गत सुरु असलेल्या मल्टी एक्सेल बससेवेचा या वर्षी मोठा विस्तार करण्यात आला .तसेच याच एसटीमार्फत आपल्या

महाराष्ट्रात अनेक प्रवाशी मार्गावर सेवा सुरू करण्यात आली.मागच्या वर्षासारखेच याही वर्षी आपल्या महाराष्ट्र एसटीचे शासनात पुर्णतः विलीनीकरण करण्यात आले नाही.आपल्या महाराष्ट्र एसटीचे बसस्टँड आणि आगार स्वच्छ असावे यासाठी महामंडळास्तरावर स्पर्धा यावर्षी घेण्यात आली. तसेच महामंडळास बसेस कमी पडत असल्याने या वर्षी आपल्या एसटीकडुन मोठ्या प्रमाणात खासगी बसेस  भाड्याने घेण्यात आल्या.

एकंदरीत या वर्षी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदलली हेच खरे

सरत्या वर्षात भारत आणि भारताच्या   शेजारील देशांचे राजनैतिक संबंध  कसे होते हे  समजण्यासाठी पुढील लिंकवर  क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_19.html 

सरत्या वर्षात  भारताच्या  क्रीडाविश्वात काय घडामोडी  झाल्या हे समजण्यासाठी पुढील लिंकवर  क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_18.html

सरत्या वर्षात भारत आणि जगातील विविध देश (सार्क देश वगळून )  यांचे राजनैतिक संबंध  कसे होते हे  समजण्यासाठी पुढील लिंकवर  क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/3.html





Comments

Popular posts from this blog

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?