२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत


अंधाऱ्या
  रात्री आपण  आकाशाकडे नजर टाकल्यास आपणास आकाशाचे नयनरम्य विलोभनीय दर्शन होते . ज्याचे आपल्या  सर्वांनाच प्रचंड आकर्षण असते   आपण आकाशाचे निरीक्षण करत असताना जर एखादा खगोलीय अविष्कार आकाशात दिसत असेल तर मग सोन्याहून पिवळे . या २०२४ वर्षात सुद्धा अश्या काही घटना आहेत ज्यावेळी आकाशाचे दर्शन करणे अत्यंत ऊत्तम आहे . चला तर जाणून घेउया या विषयी .

 या खगोलीयघटनांचे आपण सूर्यग्रहण , चंद्रग्रहण , उल्का वर्षाव ., धूमकेतूचे दर्शन ,  सूर्यमालिकेतील ग्रहांचे विलोभनीय दर्शन ,  विविध ग्रहांची एकमेकांशी होणारी युती . यासारख्या विविध प्रकारात विभाजन करू शकतो . त्यातील उल्का वर्षाव या प्रकारातील घटना सर्वप्रथम बघूया

वर्षाची सुरवातच उल्कावर्षांवाने होणार आहे  हे जानेवारीदरम्यान क्वाड्रंटिड्स हा उल्कावर्षाव बघता येईल या उल्कावर्षावात जास्तीत जास्त  प्रतितास ४० उल्का असतात. २००३  मध्ये सापडलेल्या 2003 EH1 नावाच्या सध्या नामशेष  झालेल्या  धूमकेतूने मागे सोडलेल्या धुळीच्या कणांनी त्याची निर्मिती केली असल्याचे मानले जाते. हा उलकवर्षाव दरवर्षी दरवर्षी ते जानेवारीपर्यंत चालतो. या वर्षी जानेवारीची रात्र आणि तारखेची पहाट हा कालावधी हा उल्कावर्षाव बघण्यास अतिशय उत्तम आहे  मध्यरात्रीनंतर अंधारलेल्या ठिकाणावरून सर्वोत्तम दृश्य असेल. बुटेस नक्षत्रातून उल्का बाहेर पडतील, परंतु आकाशात कुठेही दिसू शकतात.

Lyrids उल्कावर्षाव. बघण्यासासाठी यावर्षी २२ आणि २३ एप्रिल हे दिवस सर्वोत्तम आहेत दरवषी १६ ते २५ एप्रिल दरम्यान हा उल्कावर्षाव होतो हा उल्कावर्षाव धूमकेतू C/1861 G1 थॅचरने मागे सोडलेल्या धुळीच्यकणांमुळे निर्माण होतो या धूमकेतचा शोध , १८६१ मध्ये लागला होता.या उल्का कधी कधी चमकदार धुळीच्या खुणा तयार

करू शकतात जे कित्येक सेकंद टिकतात. त्यामुळे निर्माण होणारे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते   हा उल्का वर्षाव वर्षभरात होणाऱ्या उल्कवर्षावांचा विचार करता मध्यम श्रेणीत येऊ  शकेल असा उल्काववर्षाव आहे

Eta Aquarids उल्कावर्षाव बघण्यासाठी यावर्षी आणि मे  हे दोन दिवस उत्तम आहेत . हा उल्कावर्षाव सुप्रसिद्ध हॅलेच्या धूमकेतूमुळे होतो . हा उल्का वर्षाव वर्षभरात होणाऱ्या उल्कवर्षावांचा विचार करता ऊत्तम श्रेणीत येऊ  शकेल असा उल्काववर्षाव आहे या उल्कावर्षावात दक्षिण गोलार्धात तशी ६० उल्का तर उत्तर गोलार्धात तशी ३० पर्यंत उल्का दिसू शकतात हा उल्कावर्षाव कुंभ राशीतून होतो Delta Aquarids    हा उल्कावर्षाव यावर्षी २८ आणि २९ जुलै हे दोन दिवस उत्तम आहे दरवर्षी कुंभ राशीतून १२ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान हा उल्काववर्षाव  होतो हा उल्कावर्षाव  मार्सडेन आणि क्रॅच या खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेल्या आणि त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या धूमकेतूमुळे होतो वर्षभरात होणाऱ्या उल्कावर्षावाचा विचार करता हा उल्कवर्षाव माध्यम श्रेणीत मोडणारा उल्कावर्षाव आहे ज्यामध्ये तशी २० उल्का दिसू शकतील .पर्सीड्स उल्कावर्षाव यावर्षी १२ आणि १३ ऑगस्ट रोजी सर्वोत्तम स्थितीत दिसेल वर्षभर होणाऱ्या उल्कावर्षावाचा विचार करता हा उल्कावर्षाव सर्वोत्तम श्रेणीत मोडता येऊ शकतो या उल्कवर्षावात तासी  ८०पर्यंत उल्का दिसू शकतात हा उल्का वर्षाव स्फीट  टटल या धूमकेतूमुळेदरवषी १७ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान होतो आपल्याकडे हा पावसाचा कालावधी असल्याने याची मजा आपल्याला पुरेशी घेता येत नाही

ड्रॅकोनिड्स उल्कावर्षाव वर्षभर होणाऱ्या उल्कावर्षावाचा विचार करता किरकोळ या श्रेणीत हा उल्कावर्षाव आहे ज्यामध्ये फक्त तासी  १०उल्का पडतात 21P Giacobini Zinner या धूमकेतूने द्वारे मागे सोडलेल्या धुळीच्या

कणांद्वारे त्याची निर्मिती केली जाते,. ते १० ऑक्टोबर मध्ये दरवषी हा उल्का वर्षाव होतो यावर्षी या उलवर्षावाची सगळ्यात सगळ्यात चांगली  स्थिती ऑक्टोबर रोजी आहे

ओरिओनिड्स  हा मध्यमश्रेणीतील उल्कावर्षाव आहे ज्यामध्ये तासी २० पर्यंत उल्का दिसू शकते . हा उल्कावर्षाव  सुप्रसिद्ध धूमकेतू, हॅलेच्या धूमकेतूमुळे होतो  दरवर्षी 2 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत हा उल्कावर्षाव होतो टॉरिड्स हा दीर्घकाळ चालणारा किरकोळ उल्कावर्षाव आहेज्यामध्ये  तासी ते १० उल्का दिसतात . दरवर्षी 7 सप्टेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत  हा उल्का वर्षाव होतो यावर्षी या वर्षी 4 नोव्हेंबरच्या रात्री आणि 5 तारखेच्या पहाटे याची सर्वोत्तम अवस्था आहे हा उल्कावर्षाव का होतो याबाबत दोन मतप्रवाह आहेत एका मतानुसार  2004 TG10 या लघुग्रहामुळे तर  दुसऱ्या मतानुसार  तू 2P Encke या धूमकेतूमुळे हा उल्कावर्षाव होतो

लिओनिड्स उल्कावर्षाव. बघण्याची सर्वोत्तम वेळ १७ आणि १८ नोव्हेंबर आहे सिंह राशीतून होणार हा मध्यम किंवा किरकोळ श्रेणीत मोडणारा उल्कावर्षाव आहे ज्यामध्ये दर तासाला १५ उल्का पडतात हाउल्का वर्षाव दर ३३ वर्षांनी उत्तम स्थितीत येतो जेव्हा हा उलवर्षाव उत्तम स्थितीत असतो तेव्हा तासी १०० हुन अधिक वेगाने उल्कावर्षाव होतो या आधी २००१ साली तो सर्वोत्तम दिसला होता टेम्पल टटल या धूमकेतू मुळे ते ३० नोव्हेंबर रोजी हा उल्कावर्षाव होतो

उल्कावर्षावाचा राजा म्हणता येईल अशा उलकवर्षाव वर्षाच्या शेवटी बघता येईल जेमिनिड्स , उल्कावर्षावात सर्वोत्तम अवस्थेत  प्रति तास १२० बहुरंगी उल्का पाडण्याचा इतिहास आहे यावर्षी हि अवस्था १३ आणि १४ डिसेंबर रोजी गाठली जाईल मिथुन राशीच्या पार्श्वभूमीवर हा उल्का वर्षाव होईल . १९८२ मध्ये शोधलेल्या ३२०० Phaethon नावाच्या लघुग्रहामुळे हा उल्कावर्षाव होतो  दरवर्षी ते १७ सप्टेंबर पर्यंत हा उल्काववर्षाव होतो

वर्षाची अखेर उर्सिड्स या किरकोळ उल्कावर्षावाने होईल आहे ज्यामध्ये तासी ते १० उल्का पडतील दरवर्षी१७

२५ डिसेंबर या कालावधीत हा उल्का वर्षाव होतो या वर्षी 21 तारखेच्या रात्री आणि 22 तारखेच्या पाहते हा उलवर्षाव सर्वोत्तम असेल

 उल्कावर्षापेक्षा अधिक रंजक अवकाशीय गोष्ट म्हणजे धूमकेतू होय . धूमकेतू कुठून येतात कुठे जातात धूमकेतूत काय असते याबाबत आता बरीच माहिती झालेली असली तरी त्याचे आकर्षण कमी होता वाढतच आहे या वर्षी आपणास तीन धूमकेतू दिसणारआहेत  हे धूमकेतू उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात दिसणार असल्याने जर अवकाळीपावसाचा अडथळा आल्यास आपणास या धूमकेतूची मजा लुटता येणार आहे तर मित्रानो मार्च आधीचे पंधरा दिवस आणि नंतरचे पंधरा दिवस ज्या सुमारे एक महिन्याच्या कालावधीत सी २०२१एस हा धूमकेतू पाहता येणार आहे मार्च रोजी तो सूर्याच्या सर्वात जवळ असल्याने या दिवशी तो सर्वाधिक ठळक होईल तर त्या नंतर सुमारे डिड ते पावणेदोन महिन्याच्या अंतराने आपणास  12P/Pons–Brooks हा धूमकेतू आपणास बघता येईल हा धूमकेतू २२ एप्रिलला सर्वात ठळक दिसेल २२ एप्रिलच्या आधी  १५ दिवस आणि नंतर पंधरा दिवस हा पाहुणा आपले दर्शन देईल त्यानंतर धूमकेतू पाहण्यासाठी आपणास ऑक्टोबरपर्यंत वाट बघावी लागेल २२ ऑक्टोबरला  C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) हा धूमकेतू आपणास बघता येईल

 दरवर्षी नित्यनियमाने होऊन सुद्धा ज्याविषयी आपल्याकडे अजूनही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे तो MAQHNJE ग्रहण होय या वर्षी आपणास २५ मार्च रोजी आंशिक चंद्रग्रहण तर एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे मात्र दुर्दैवाने आपल्या भारतात हि दोन्ही ग्रहणे दिसणाना हीत सूर्यग्रहण युरोप खंड 

आफ्रिकेच्या उत्तर भाग आणि लगतच्या भागात दिसेल तर चंद्रग्रहण अमेरिका खंडाच्या पश्चिमेला दिसेल . १८ सप्टेंबर रोजी आंशिक चंद्रग्रहण आहे तर ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण आहे आपल्या भारतीयांच्या दुर्दैवाने हि दोन्हीही ग्रहणे भारतातून दिसणार नाहीत

आता बघूया विविध ग्रह बघण्यासाठीच्या उत्कृष्ट वेळा

आपण मोकळ्या मैदानात जेव्हा नजर फिरवतो तेव्हा ज्या ठिकाणी आकाश आणि जमीन एकत्र आलेले दिसते त्यास क्षितिज म्हणतात हे आपण कोणताही ग्रह बघताना लक्षात घेयला हवे

बुध ग्रह बघण्यासाठी १२ जानेवारीच्या पहाट एक उत्कृष्ट वेळ आहे यावेळी सूर्योदयापूर्वी पूर्वेला क्षितीजाच्या सर्वीच उंचीतर बुध  ग्रह बघता येईल तर २४ मार्च रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुमारे एक तास पश्चिमेला बुध ग्रह बघता येईल २५डिसेंबर रोजी देखील सूर्योदयापूर्वी बुध ग्रह बघायला उत्तम कालावधी आहे सप्टेंबर रोजी शनी ग्रह वर्षातील सर्वात ठळक दिसणार आहे तर डिसेंबर रोजी गुरु ग्रह वर्षातील सर्वात ठळक दिसणार आहे मी या आधी सांगितलेल्या बाबी उघड्या डोळ्यांनी बघता दुर्बिणीशिवाय बघता येतील यापुढे मी सांगणार असलेल्या खगोलीय घटकांना मात्र दुर्बिणीची आवश्यकता आहे तर २१ सप्टेंबर रोजी नेपच्यून तर १७ नोव्हेंबर रोजी युरेनस ग्रह उत्तम दिसणार आहे

मग बघणार अन या घटना

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?