सिंहावलोकन २०२३ भारतात आलेल्या नैसर्गिक आपत्ती

   


सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता  ग्रेनीयन कॅलेंडर वर्षच सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात भारतात आलेल्या नैसर्गिक आपत्ती या क्षेत्रातील घडामोडी बघूया

नैसर्गिक आपत्तीचा विचार करता सरते वर्ष  २०२३ हे कायमच स्मरणात राहील कंप, ज्वालामुखीचा उद्रेक, जमीन खचणे दरडी कोसळणे या सारख्या जमिनीशी संबंधित आपत्ती या भूगर्भाशी निगडित आपत्ती म्हणून समजल्या जातात तर अतिशय जास्त पाऊस, अतिशय कमी पाऊस,  पावसाचे उशिरा येणे, पावसाचे उशिरा माघारी परतणे,  बेमोसमी (अवकाळी ) पाऊस, गारा पडणे, वीज पडणे, अतिशय कडक ऊन,  अत्यंत बोचरी थंडी,  या आपत्तींना हवामानाशी संबंधित आपत्ती म्हणून ओळखले जाते  भूगर्भाशी निगडित आणि हवामानाशी निगडित अस्या दोन उपप्रकारात  भारताला सरत्या वर्षांत आपत्ती सहन कराव्या लागल्या .

 नैसर्गिक आपत्ती संदर्भात वर्षांचा आढावा घेताना पहिले भूगर्भाशी निगडित आपत्तीचा पहिल्यांदा विचार करू .  जुलै महिन्यात रायगड जिल्यातील इर्शाळवाडी या येथे दरड कोसळून १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला  तर सुमारे १०० जण जखमी झाले . मूसळधार पावसामुळे डोंगर कड्यावरील माती खाली घसरून डोंगर कड्याचा आधार गेल्याने ही दूर्घटना झाल्याचे सांगण्यात आले. सिक्कीम राज्यात तसेच उत्तराखंड  हिमाचल प्रदेशातही या प्रकारच्या दूर्घटना भारताने यावर्षी अनुभवल्या.

 नेपाळ तसेच पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर असणाऱ्या पामीर गाठ  परिसरात यंदा मध्यम ते भयानक यांच्या सीमेवरची रिटेक्टर स्केल असणारे चार भुकंप झाले.ज्याचा परिणाम उत्तर भारतात देखील जाणवला‌. महाराष्ट्राच्या काही भागात भुकंपाचे अतीसौम्य असे धक्के जाणवले.

हवामानाचा विचार केला असता या आपत्तीमुळे भारताचे अतोनात नुकसान झाले.यावेळी मान्सूम उशीरा सक्रिय झाला. तसेच या वर्षी मान्सुमचा पाउस महाराष्ट्राचा विचार करता कमी पडला. यावेळी पुर्व विदर्भाचा विचार करता महाराष्ट्रात कुठेही मोठे पूर आले नाहीत. बेमोसमी (अवकाळी पाउस) यावेळी मोठ्या प्रमाणात पडला.मार्च महिन्यात आणि नोव्हेंबर महिन्यात  महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेमोसमी (अवकाळी) पाउस पडला. यावर्षी उत्तराखंड बरोबर हिमाचल प्रदेशात देखील ढगफुटीच्या घटना आपण अनूभवल्या. सिक्कीम राज्यात ढगफुटीच्या तिस्ता नदीला महापूर आल्याने सिक्कीममध्ये तैनात लष्कराचे मोठे नुकसान झाले. मागच्या काही वर्षांप्रमाणे याही वर्षी बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळाची संख्या वाढतीच राहिली.या वर्षी वेस्टन डिस्टर्बन चा प्रभाव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बघायला मिळाला 

मागच्या काही वर्षांप्रमाणे याही वर्षी मागचे , रेकॉर्ड मोडणारे तापमान उन्हाळ्यात नोंदवले गेले. हिवाळ्याची सुरवात काहीसी उशीरा झाली.या वर्षाच्या कॉपमध्ये भारताने कोळस्याचा वापर पुर्णतः थांबवण्याचा कराराला विरोध दर्शवला.

एकंदरीत भारतासाठी हे वर्ष नैसर्गिक आपत्तीचा विचार करता वादळीच ठरले 


सरत्या वर्षात भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत काय बदल झाले हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_20.html

सरत्या वर्षात भारताचे शेजारी देशांशी कसे राजनैतिक संबंध राहिले हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_19.html

सरत्या वर्षात भारताच्या क्रीडाविश्वात काय घडामोडी घडल्या हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_18.html

सरत्या वर्षात भारत आणि जगातील विविध  देश (सार्क देश वगळून )यांच्यातील राजनीतिक संबंध कसे राहिले हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/3.html



Comments

Popular posts from this blog

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?