Posts

Showing posts from December, 2023

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

Image
अंधाऱ्या   रात्री आपण   आकाशाकडे नजर टाकल्यास आपणास आकाशाचे नयनरम्य विलोभनीय दर्शन होते . ज्याचे आपल्या   सर्वांनाच प्रचंड आकर्षण असते    आपण आकाशाचे निरीक्षण करत असताना जर एखादा खगोलीय अविष्कार आकाशात दिसत असेल तर मग सोन्याहून पिवळे . या २०२४ वर्षात सुद्धा अश्या काही घटना आहेत ज्यावेळी आकाशाचे दर्शन करणे अत्यंत ऊत्तम आहे . चला तर जाणून घेउया या विषयी .   या खगोलीयघटनांचे आपण सूर्यग्रहण , चंद्रग्रहण , उल्का वर्षाव ., धूमकेतूचे दर्शन ,   सूर्यमालिकेतील ग्रहांचे विलोभनीय दर्शन ,   विविध ग्रहांची एकमेकांशी होणारी युती . यासारख्या विविध प्रकारात विभाजन करू शकतो . त्यातील उल्का वर्षाव या प्रकारातील घटना सर्वप्रथम बघूया वर्षाची सुरवातच उल्कावर्षांवाने होणार आहे   १ हे ५ जानेवारीदरम्यान क्वाड्रंटिड्स हा उल्कावर्षाव बघता येईल या उल्कावर्षावात जास्तीत जास्त   प्रतितास ४० उल्का असतात . २००३   मध्ये सापडलेल्या 2003 EH1 नावाच्या सध्या नामशेष   झालेल्या   धूमकेतूने मागे सोडलेल्या धुळीच्या