Posts

Showing posts from November, 2023

पाकिस्तान होईल का ब्रिक्स चा सदस्य ?

Image
चीन, भारताच्या जागतिक महासत्ता  होण्याच्या वाटेतील मोठा अडथळा  असणारा देश.  स्वतःला जागतिक महासत्ता होण्याचे असल्याने भारताला त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारा भारताचा शेजारी देश म्हणजे चीन.सीमेबाबत वाद असला तरी चीनने भारताची महासत्ता होण्याची ताकद ओळखली आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहु शकत नाहीत, त्याप्रमाणे चीन स्वतःच्या  महासत्ता होण्याचा वाटेतील अडथळा अर्थात आपल्या भारताला सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो.त्याच मालिकेत चीनने एक नविन कार्ड नुकतेच खेळले आहे.ते म्हणजे जगात सर्वाधिक वेळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागणाऱ्या ,काही महिन्यांपूर्वी ज्या देशाचा पंतप्रधान जगात अक्षरशः कटोरा घेवून भगवान के नाम पर, अल्ला के नाम कुछ देदेरे बाबा भगवान अल्ला तूम्हारा भला करेगा असे म्हणत जगात फिरत होता.त्या पाकिस्तानला ज्या गटाचा एकत्रीत जिडीपी जगात जी 20, जी 7 या दोन गटानंतर तिसऱ्या क्रमांकाचा आहे,त्या ब्रिक्स या गटाचे सदस्यत्व देण्याबाबतची आग्रही भुमिका मांडण्याचे .त्यासाठी तो रशियावर अप्रत्यक्ष दबाव देखील आणत आहे.एकेकाळी रशिया चीन राजनैतिक संबंधात रशिया हा

भारताचे शेजारी आणि हिंदू धर्म

Image
आपला भारत हा धर्मनिरपेक्ष देश असला तरी भारतात हिंदू धर्मीय लोक बहुसंख्येने आहेत,‌हे आपण जाणताच. जगात इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असलेले 51 देश आहेत. त्यामुळे इस्लामधर्माबाबत कुठेही काही अनुचित घडले तर ते देश पुढे सरसवतात. ख्रिस्ती धर्माबाबत बोलायचे झाल्यास बहुसंख्य यूरोप,आणि उत्तर अमेरिका खंडातील देश त्यांची बाजू घेतात. या उलट  हिंदू धर्माबाबतची गोष्ट  आहे. हिंदू धर्मीय व्यक्तींना भारताशिवाय आधार दिसत नाही  तसेही कुठेही हिंदू व्यक्ती असला तरी त्याचे मुळ कुठेना कुठे आपल्या भारतातच सापडते.त्यामुळे हिंदू धर्मियाबाबत जगात कुठे काही झाले तर त्याचे पडसाद आपल्या भारतात उमटतात. आणि ते देश आपल्या सभोवतालचे असले तर त्यात अजूनच भर पडते.हे सांगायचे कारण म्हणजे हिंदू धर्मीयांबाबत नेपाळ आणि बांगलादेश यामध्ये घडणाऱ्या गोष्टी.      तर देशाचा राष्ट्रीय धर्म हिंदू करावा या मागणीसाठी सध्या नेपाळमध्ये आंदोलन सुरू आहे.सन 2008पासून नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.सन2008चा आधी नेपाळ जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते. 2008मध्ये लागू करण्यात आलेल्या संविधानानुसार सत्तेत आलेल्या साम्यवादी पक्षांनी नेपाळ धर्मनिरपेक्ष

भारताचे अशांत शेजार आणि लोकशाही

Image
     आपल्या भारतात पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे सर्व वातावरण ढवळून निघाले असताना भारताच्या शेजारी असणाऱ्या नेपाळ आणि म्यानमार या दोन देशातील वातावरणसुद्धा लोकशाहीच्या दोन वेगवेगळ्या आंदोलनामुळे ढवळून निघत आहे . नेपाळमध्ये सध्याची वर्तमान गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था मोडीत काढत  संविधानिक राजेशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे तर म्यानमार या शेजारील देशामध्ये सध्याची वर्तमान असणारी लष्करशाही पद्यच्युत करून लोकशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी करण्यात आलेल्या चळवणीने  निर्णायक स्वरूप गाठले आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ख्याती असलेल्या आपल्या भारताच्या शेजारील या दोन देशामध्ये लोकशाहीविषयक या आंदोलनाने एक आश्चर्यकारक स्थिती जगात निर्माण केली आहे          नेपाळमध्ये सध्या भारतासारखीच गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था आहे ज्यामध्ये देशाचा प्रमुख हा लोकांमार्फत अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो . मात्र हि व्यवस्था मोडीत काढत देशात इंग्लड सारखी घटनादत्त राजेशाही व्यवस्था असावी यासाठी  नेपाळमध्ये सध्या आंदोलन करण्यात येत आहे तसे या प्रकारचे

भारत ऑस्ट्रेलिया मैत्री चिरायू होवो

Image
     क्रिकेटमध्ये   ५० ओव्हरच्या पुरुष विश्वचषकात ऑस्टेलियाने भारताला धूळ चारली , मात्र हे होऊन काहीच तास होत नाहीत तोच पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया भारतात   एकदा चर्चेत आले . काही तासांच्या अवधीत दुसऱ्यांदा चर्चेत आलेल्या या घटनेत मात्र खेळाडू नव्हे तर राजनैतिक व्यक्ती कारणीभूत होत्या . निमित्य होते भारताने आयोजित केलेली भारत ऑस्ट्रेलिया 2 +2 मिटींग्स . ज्यात भारतातर्फे भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथसिंग आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी प्रतिनिधित्व केले तर ऑस्ट्रियातर्फे त्यांचे सरंक्षणमंत्री जे ऑस्टरलियाचे उपपंतप्रधान देखील आहेत असे रिचर्ड मार्ल्स आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनी प्रतिनिधित्व केले २० आणि २१ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत ही   बैठक पार पडली हि या प्रकारची   ऑस्ट्रेलियाबाबरोबरची दुसरी मिटींग्स होती या आधीची मिटींग्स २०२१ साली झाली होती           कोणत्याही दोन देशांतील राजनैतिक संबधाचा विचार करता   2 +2 मिटींग्स या अत्यंत महत्वाच्या समजल्या जात