Posts

Showing posts from September, 2023

दक्षिण कोरियाचा घटनेतून आपण काय बोध घेणार ?

Image
  गेल्या बुधवारी अर्थात २० सप्टेंबर रोजी दक्षिण कोरिया या देशाच्या संसदेने एक शिक्षण विषयक कायदा केला . जो   कायदा आपल्या भारताला देखील खूप काही शिकवून जाणारा आहे   शिक्षणाचा सर्वगाडा ज्या शिक्षकांवर असतो त्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या संबंधावर मोठा दूरगामी परिणाम करणारा हा कायदा आहे . एका २३ वर्षीय शिक्षकाने पालकांनी केलेल्या तक्रारीवरून त्रासून जाऊन आत्महत्या केल्याची काळी किनार या कायद्यास आहे . या कायद्यान्वये शिक्षकांना पालकांनी तक्रार केल्यावर लगेचच कामावरून कमी करण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे तसेच त्यांना कायदेशीर मदत पुरवणे , तसेच त्यासाठी योग्य   प्रमाणात आर्थिक मोबदला देणे या जवाबदाऱ्या मुख्याध्यापकांवर   सोपवण्यात आल्या आहेत   तसेच शिकवताना अडथळा आणणाऱ्या विद्यार्थ्यास माफक प्रमाणात शिक्षा करणे आधी अधिकार मिळणार आहेत . या प्रकारच्या कायदा करण्यात यावा या साठी दक्षिण कोरियातील शिक्षकांनी देशभर आंदोलन केले होते     ( दक्षिण कोरिया हा टीचभर क्षेत्रफळाचा देश

उत्तर आफ्रिकेच्या घटनेतून आपण काय शिकणार ?

Image
  गेल्या पंधरा दिवसाचा आढावा घेतल्यास उत्तर आफ्रिकेच्या दोन देशात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीने मोठ्या प्रमाणात बळी घेतले . लिबिया या देशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने आणि दोन धरणे फुटल्याने शब्दशः   हाहाकार उडाला . देशातील दोन मोठी शहरे अक्षरशः भुईसपाट झाली येथे खरेच शहरे होती का ? अशा प्रश्न उपस्थित व्हावा अशी तेथील भौगोलिक स्थिती झाली . तर मोरोक्को या देशात शक्तिशाली म्हणता येईल असा ६ पूर्णांक ८ शतांश तीव्रतेचा मोठा भूकंप झाला   ज्यामध्ये हजारो   जणांना आपले प्राण गमवावे लागले       उत्तर आफ्रिकेत झाले ना हे ! आपण भारतात राहतो आपण काय त्यांच्यासाठी अश्रू ढाळायचे ? आपल्याला काय कमी प्रॉब्लेम आहेत ?   म्हणून   याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही तर पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने आपण त्यांच्या चुकांमधून शहाणे होणे गरजेचे आहे आपल्या भारताचा विचार करता हिमालयीन प्रदेश भूकंपाच्या अति संवेदनशील भागात मोडतो .   भूगर्भ शास्त्रज्ञांनी हिमालयीन क्षेत्रात मोठा

नाशिकरांसाठी गौरवास्पद क्षण

Image
  २३ सप्टेंबर पासून   ८ ऑक्टोबर पर्यतचा कालावधी नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण नाशिकचे भूमिपुत्र   असणारे तरुणाईचे आयकॉन विदित गुजराथी हे चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आशियाई स्पर्धेत बुद्धिबळ या खेळात भारताच्या पुरुष संघाचे कप्तान असणार आहेत एका नाशिककारास भारताचे नेतृत्व करायची संधी मिळणे ते देखील एशियाड सारख्या महत्वाच्या स्पर्धेत ही समस्त नाशिककरांना अभिनंदनास्पद बाबच म्हणावी लागेल             ही   बुद्धिबळ स्पर्धा जलद ( रॅपिड ) प्रकारात खेळवली जाणार आहे फिडे वर्ल्ड कपमध्ये केलेल्या प्रदर्शनामुळे सर्व भारताला माहिती झालेल्या आर प्रग्ण्यांनंद , यांच्यासह डी गुकेश , पेंटला हरिकृष्ण , अर्जुन एरिगैसी हे सर्व विदित गुजराथी नेतृत्वात खेळतील टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेतील अंत्यंत उत्कृष्ट कामगिरीमुळे या स्पर्धेत सर्वांच्या नजरा या भारतीय पुरुष संघाकडे लागलेल्या असतील महिला संघाचे प्रतिनिधित्व एशियाड या स्पर्धेत वैयक्तिकरित्या सुवर्णपदक मिळवलेल्या आणि महिला संघ

कोट्याच्या घटनेतून आपण काय शिकणार ?

Image
  कोटा आणि पुणे दोन्ही शहरे ही   स्पर्धा परीक्षा या क्षेत्राचा विचार करता अत्यंत महत्वाची समजली जातात . दोन्ही शहरामध्ये अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि देशभरातून येतात . लोकसेवा आयोगाची असो किंवा अन्य व्यावसायिक शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी   द्यावयाची प्रवेश परीक्षा असो ,  ती स्पर्धा परीक्षा असल्याने त्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सारखाच ताण असतो . त्यांच्या अडचणी सारख्याच असतात . त्यामुळे एका शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींना ज्या अडचणी भेडसावतात , त्याच अडचणी दुसऱ्या शहरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना जाणवणार हे सूर्य प्रकाश्याइतके स्पष्ट आहे . त्या सोडवण्याचा पद्धती देखील सारख्याच असणार .. मात्र एकाचवेळी दोन्ही शहरांत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सारख्याच समस्या जाणवतील असे नाही . त्यामुळे या दोन्ही शहरांतील घडामोडी दुसऱ्या शहरासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरतात . या पार्श्