उत्तर आफ्रिकेच्या घटनेतून आपण काय शिकणार ?


 गेल्या पंधरा दिवसाचा आढावा घेतल्यास उत्तर आफ्रिकेच्या दोन देशात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीने मोठ्या प्रमाणात बळी घेतले . लिबिया या देशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने आणि दोन धरणे फुटल्याने शब्दशः  हाहाकार उडाला. देशातील दोन मोठी शहरे अक्षरशः भुईसपाट झाली येथे खरेच शहरे होती का ? अशा प्रश्न उपस्थित व्हावा अशी तेथील भौगोलिक स्थिती झाली . तर मोरोक्को या देशात शक्तिशाली म्हणता येईल असा पूर्णांक शतांश तीव्रतेचा मोठा भूकंप झाला  ज्यामध्ये हजारो  जणांना आपले प्राण गमवावे लागले

      उत्तर आफ्रिकेत झाले ना हे ! आपण भारतात राहतो आपण काय त्यांच्यासाठी अश्रू ढाळायचे ? आपल्याला काय कमी प्रॉब्लेम आहेत ?  म्हणून  याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही तर पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने आपण त्यांच्या चुकांमधून शहाणे होणे गरजेचे आहे आपल्या भारताचा विचार करता हिमालयीन प्रदेश भूकंपाच्या अति संवेदनशील भागात मोडतो.  भूगर्भ शास्त्रज्ञांनी हिमालयीन क्षेत्रात मोठा विनाशकारी भूकंप येण्याची शक्यता या आधीच वारंवार सांगितली आहेच

         सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस देखील याच भागात पडतो आहे.  जगभरातील लहरी पावसाच्या सध्याच्या घटना बघता पाऊस दिवसोंदिवस अधिक लहरी होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे विविध विकासकांमुळे अधिक काहीसा ठिसूळ असलेला हिमालयीन प्रदेश अजूनच ठिसून झाला आहे  तसेच जगभरात

होणाऱ्या भूकंपाच्या वाढत्या घटना बघता ऊत्तर भारत कोणत्या मोठ्या संकटाला सामोरे जाऊ शकतो याचा केवळ  अंदाज बांधला तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही देव करो पण दोन्ही संकटे एकदम आल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणार हे सहजतेने समजते .

          भारताच्या लोकसंख्येचा विचार करता सर्वाधिक लोकसंख्या ही उत्तर भारतात आहे  दुर्दैवाने नैसर्गिक संकटे देखील याच भागात येणार आहेत त्यामुळे या संकटाला सामोरे जाण्यासाठी तेथील सर्वसामान्य नागरिकांना तयार  अत्यावश्यक आहे सरकारी पातळीवर या बाबाबत पूर्णपणे नियोजन झाले देखील असेल मात्र हे नियोजन ज्या नागरिकांसाठी आहे त्या नागरिकांची या बाबत तयारी झाली आहे का ? किमानपक्षी नागरिकांना या धोक्याची जाणीव तरी आहे का ?याचा विचार केल्यास समोर येणारे चित्र फारसे समाधानकारक नाही असेच खेदाने म्हणावे लागते जे सुधारण्याची युद्धस्तरावर गरज आहे ते सुधारले तर आणि तरच आपण या संकटाला सामोरे जाऊ शकू अन्यथा नाही

 

अजिंक्य तरटे

९५५२५९९४९५

९४२३५१५४००

Comments

Popular posts from this blog

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?