नशिबाला दोष न देता, विजयश्री खेचून आणणारी प्रेरणादायी व्यक्तीमत्वे
जगी सर्व सुखी कोण आहे ? विचारी मना तूच शोधून पाहे अशी विचारणा करत समर्थ रामदास स्वामी जगात कोणीच पूर्णतः सुखी नसतो प्रत्येकास काहींना काही दुःख असते (अगदी मुकेश अंबानी याच्या मुलाला असाध्य असा आजार आहे ) फक्त आपण त्या दुःखाला कोणत्या प्रकारे सामोरे जातो . याला मह्त्वाचे असते असा सल्ला देतात जगताना स्वतःचे दुःख कुरवाळत बसण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करत अरे याच्या तुलनेत माझे दुःख काहीच नाही असे मानून समाधानी राहावे . हा जीवन जगण्याच्या सर्वोत्तम उपाय असल्याची शिकवण अनेक मोटिव्हशन स्पीकर देताना बघतो . मात्र अनेकदा बहुतांश माणसे याकडे दुर्लक्ष करत आपल्याला काय मिळाले आहे याचा विचार न करता आपल्याला काय मिळाले नाही याचा विचार करत दुखी होतात मात्र जगात प्रत्येक गोष्टीला प्रति गोष्ट अस्तित्वात असतेच जसे हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीला उन्हाळ्या रणरणते ऊन असते जन्मला मृत्यू ही प्रतिग...