Posts

Showing posts from January, 2024

नाशिककरांसाठी क्षण हा अभिमानाचा !

Image
नाशिकने देशाला अनेक रत्ने दिली आहेत.आज अब्जावधींची व्यवसाय झालेल्या बॉलीवूडची उभारणी करणारे दादासाहेब फाळके, ब्रिटीशांना धडकी भरवणारे ज्येष्ठ  क्रांतीवीर स्वातंत्र्यवीर सावरकर, उत्कृष्ट फिरकी गोलंदाज बापू नाडकर्णी,,ही त्यातील काही महत्त्वाची नावे.आता या नावात अजून एक नाव समाविष्ट झाले आहे.ते म्हणजे  सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी हे नाव.                  बुद्धीबळ विश्वात जागतिक स्तरावर अत्यंत मानाचे जवळपास पहिल्या क्रमाचे मानाचे समजले  जाणाऱ्या "न्यू इन चेस या नियतकालीकाच्या, मुखपृष्ठावर सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांचा फोटो प्रसिद्ध झाल्याने यावर शिक्कामोर्तबच झाले आहे. आतापर्यंत न्यू इन चेस या नियतकालिकांमध्ये ज्यांचा फोटो मुखपृष्ठावर प्रसिद्ध होतो,अस्या खेळाडुने भविष्यात विश्वविजेते पदाला गवसणी घातण्याचा इतिहास आहे‌.तो बघता नाशिकचे भुमीपुत्र असलेले सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी हे भावी विश्वविजेते आहेत,हे सुर्याप्रकाश्याइतके स्पष्ट आहे, आणि असा खेळाडू आपल्या नाशिक शहरात राहतो ही समस्त नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे.             गेल्या काही वर्षांपासून बघता विद

भारतीय बुद्धीबळपटू विश्वविजेता होणार ?

Image
     या वर्षी भारतीय क्रिडाविश्वाचा विचार करता इतिहास घडला आहे. जगातील महत्त्वाच्या आठ बुद्धीबळपटुंचा सहभाग असलेल्या  कॅन्डिडेट् स्पर्धेत पुरूषांचा गटात तीन तर महिला गटात दोन बुद्धीबळपटू  हे भारतीय आहेत. विद्यमान विश्वविजेत्यांशी कोण लढत देणार ?हे कॅन्डिडेट् स्पर्धेद्वारे ठरते, हे लक्षात घेता,  भारतीय बुद्धिबळपटुंनी किती लक्षणीय कामगिरी केली आहे,हे लक्षात येते‌ .कॅन्डिडेट् स्पर्धेत पुरूष गटात आठ खेळाडू असतात या वर्षी या आठ खेळाडूंपैकी 3 म्हणजे 37.5 टक्के तर महिला गटात आठ खेळाडूंपैकी 2म्हणजे 25टक्के खेळाडू भारतीय आहेत.जगात सुमारे 190 देशात बुद्धीबळ खेळले जाते.त्याचा विचार करता आपल्या बुद्धिबळपटुंनी किती उत्तम कामगिरी केली आहे.हे लक्षात येते. वरील आकडेवारी बघता या वर्षी कोणता तरी भारतीय बुद्धीबळपटू विश्वविजेता होण्याची दाट शक्यता वाटते.ही अव्वल कामगिरी करणारे पुरुष बुद्धीबळपटु आहेत नाशिकचे सुपुत्र सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी, माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसन यांना एकाच वर्षात दोनदा हरवण्याचा पराक्रम करणारे ग्रँडमास्टर आर.प्रज्ञानंद , आणि ग्रँडमास्टर डी गुकेश तर महिला गटात ग्रँडमास्टर