Posts

Showing posts from August, 2023

नवे आव्हान पेलण्यासाठी सक्षम होते आहे आपली यस्टी!

Image
  मी महाराष्ट्र एसटीमध्ये कार्यरत नसलो तरी , एसटीचा चाहता मात्र आहे . एसटी महामंडळाच्या विविध योजनांचा फायदा घेत , महाराष्ट्रातील नागपूर   या प्रशासकीय विभागाचा अपवाद वगळता अन्य सर्व महाराष्ट्र तसेच गुजरात आणि कर्नाटकचा काही भागात फिरलो आहे . माझ्या या आवडीमुळे मी काही एसटीप्रेमी लोकांच्या व्हाँटसप आणि फेसबुक गृपमध्ये आहे . या गृपवर सध्या   आपल्या महाराष्ट्र एसटीच्या पुण्याचे   उपनगर असलेल्या दापोडीत   असणाऱ्या   वर्कशॉपमध्ये   BS 6 मानकांच्या TATA 12 मीटर चेसिसवर बांधलेल्या पहिल्या वहिल्या संपूर्ण स्लिपर 2 बाय 1 नाँन एसी गाड्यांचे फ़ोटो यायला लागलेत . एसटीचे हे पाउल मला अत्यंत महत्त्वाचे वाटते . याबद्दल लेट पण थेट या न्यायाने एसटी प्रशासन कौतूकास पात्र आहे .    या आधी आपल्या महाराष्ट्र एसटीत खाली बसण्याची सोय आणि वरती झोपण्याची सोय असलेली नाँन एसी खिडक्यांमधून हवा जाण्यायेण्याची सोय असलेली स्लिपर + सिटर ही बससेवा होती . ( लाल आणि पांढरा पट्टा असणाऱ्या बसेस ) पुर्णतः स्लीपर असी