Posts

Showing posts from June, 2023

पेटते पश्चिम बंगाल

Image
  भारताच्या अध्यात्माची पाश्चात्य जगातला ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद , भारतात रसायनशास्त्रावर आधारित उद्योगाची पायाभरणी करणारे प्रफुल्लचंद्र रे , भारताला साहित्य क्षेत्रातील नोबेल देणारे रवींद्रनाथ टागोर . अर्थशास्त्रज्ञांचे नोबेल देणारे अमात्य सेन ,  ज्येष्ठ क्रांतिकारी सुभाषचंद्र बोस ,  . आणि   बिपिनचंद्र पाल बाँलीवूडची जगाला उत्तम ओळख करुन देणारे सत्यजित रे . भारतात प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे राजा राममोहन रॉय . एकमेकांशी दुरान्वयेही संबंध नसणाऱ्या या सर्व व्यक्तींमधे एक सामान दुवा आहे . या   सर्व व्यक्ती बंगाली आहेत   बंगाल गंगेच्या त्रिभुज प्रदेशामुळे अत्यंत सुपीक झालेला प्रदेश त्यामध्ये तागासारख्या नगदी पिकांमुळे शेतीही समृद्ध म्हणावी अशी . त्या मध्ये सुरवातीला सांगितल्याप्रमाणे या सारख्या अत्यंत प्रतिभावान व्यक्तींमुळे   त्यात तर सोन्याहून पिवळे होण्यासारखी स्थिती .  भारतात सर्वाधिक पुस्तके बंगाली भाषेत वाचली जात असल्याचा इतिहास आहे . मात्र आजमितीस बंगालची स्थिती अत्

भारत कंबोडिया संबंध मैत्रीच्या नव्या वळणावर

Image
  आपल्या भारतीय संस्कृतीचा फार मोठा प्रभाव जगभरात आहे भारताच्या सभोवतालचे देशच नव्हें तर त्या पासून दूर   असणाऱ्या देशांवर देखील फार   पूवीपासून भारताचा प्रभाव आहे   . कंबोडिया हा अशाच एक देश आशिया   खंडाच्या आग्नेय दिशेला असलेल्या   इंडो चायना   भागातील भारताचा प्रभाव असणारा देश . युके ( इंग्लड ) सारखी घटनादत्त राजेशाही असणाऱ्या या देशाचे राष्ट्रप्रमुख अर्थात   विद्यमान   कंबोडियाचे राजे   नोरोडोम सिहामोनी यांनी 29 मे   ते   31 मे या   कालावधीत भारताचा दौरा केला   भारत आणि कंबोडिया यांच्यातील राजनैतिक संबंधांस   70 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा दौरा आयोजित करण्यात आला होता   1952 मध्ये त्यांच्या   तत्कालीन राजाने   भारताला भेट दिल्यावर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते त्यास यंदा 70 वर्षे पूर्ण झाली आहेत 1952 च्या त्या भेटीनंतर विद्यमान राजे नोरोडोम सिहामोनी   यांचे वडील   वडील नोरोडोम सिहानोक यांनी सन १९६३ साली . भेट दिली होती     नोरोडोम सिहामोनी यांचे   राष्ट्रपती भव

भारत नेपाळ संबंधाची नवी पहाट

Image
  नेपाळ , भारताच्या २८ पैकी उत्तराखंड , उत्तरप्रदेश , बिहार , पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पाच राज्यांबरोबर सीमा शेअर करणारा देश . उत्तराखंड या राज्यातील काही प्रदेशाबाबत काहीसा सिमववाद असणारा देश म्हणजे नेपाळ भारतीय संस्कृतीचा प्रचंड प्रभाव असलेलाभारत आणि चीन या दोन बलाढ्य देशातील बफर स्टेट म्हणजे नेपाळ तर या नेपाळचे पंतप्रधान    पुष्पकमल दहल ' प्रचंड ' हे भारताचे   पंतप्रधान   नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 31 मे ते 3 जून   या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर    आले होते .  सध्याच्या कार्यकाळात पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान प्रचंड यांची ही पहिलीच द्विपक्षीय भारत भेट होती . परराष्ट्र व्यवहार मंत्री नारायण प्रकाश सौद , , अर्थमंत्री , डॉ . प्रकाश शरण महत , . ऊर्जा , जलसंपदा आणि पाटबंधारे मंत्री , शक्ती बहादूर बस्नेत , भौतिक पायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्री ,. प्रकाश ज्वाला , उद्योग , वाणिज्य आणि पुरवठा मंत्री   रमेश रिजाल ,  हे या भेटीदरम्यान पंतप्रधानांच्या सोबतच्या शिष्टमंडळाचा