Posts

Showing posts from May, 2023

आता तरी एसटी विलीनीकरणावर निर्णय घ्या साहेब !

Image
  सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निकालामुळे सध्या महाराष्ट्र सरकारला असणारे बहुतेक सर्व धोके अडथळे दूर झाले आहेत त्यामुळे या सरकारने या सरकारमधील व्यक्तीने या आधी जाहीर केलेल्या निर्ययाची अंमलबाजवणी कधी होते ?  याकडे सर्व महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेलं आहे ज्या निर्णयाची जनता वाट बघत आहे त्यामध्ये एसटी विलीनीकरणाचा मुद्दा अग्रभागी आहे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्याचा पगवारवाढ सारख्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी ऐतिहासिक अश्या एसटी कर्मचाऱ्याच्या संपाची प्रमुख मागणी हि एसटीचे राज्य सरकारमध्ये पूर्णतः विलीनीकरण ही होती हे विसरून चालणार नाही           भारतातल्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेतील ऐतिहासिक संप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेसंपाची आठवण यावी असा संप महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांनी सुमारे   दीड वर्षांपूर्वी केला असल्याचे आपणास आठवत असेल त्यावेळी सत्ताधिकारी वर्ग हा स्वतःच्या फायद्यासाठी हा संप अयोग्य पद्धतीने हाताळत असून या संपाद्वारे एसटीचे खासगीकरण

अस्थिरतेचा मोठा इतिहास असणारा देश पाकिस्तान

Image
  मंगळवार ९ मे रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लमबाद येथे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान नॅशनल अकाउंटशी ब्युरो ( नॅब ) ने   अटक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकाच आगडोंब उसळला आहे . एका ट्रस्टच्या जमिनीचा अपहार केल्याप्रकरणी हि अटक करण्यात आली आहे इम्रान यांच्यावर पाकिस्तानात सुमारे १४० खटले दाखल करण्यात आले असून त्यातील एका खटल्यात अटकपूर्व जमीन मिळवण्यासाठी ते इस्लामाबाद   उच्च न्यायालयात गेले असता एका नाट्यमय घटनेनंतर त्यांना अटक करून अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे हे समजल्यानंतर पाकिस्तानातील जनतेत खदखदत असलेला असांतोष बाहेर येऊन त्याने उग्र हिसंक रूप धारण केले त्यामुळे पाकिस्तनात सर्व देशात   जमाबंदी जाहीर करण्यात येऊन समाजमाध्यमाने बंद करण्यात आली आहे     तसे बघायला गेल्यास विरोधकांवर सुडाचे राजकारण करण्याची पाकिस्तानात मोठी पंरपरा आहे १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान स्वातंत्र्य झाल्यावर आठवड्याभरात म्हणजेच २१ ऑगस्ट १९४७रोजी पाकिस्तानचे तत्कालीन गव्हनर जनरल मोहंमद अ

भारत बांगलादेश मैत्रीच्या नव्या अध्ययास प्रारंभ

Image
  भारत बांगलादेश मैत्रीच्या नव्या अध्ययास २ मेला   प्रारंभ झाला आणि याला कारणीभूत ठरला तो बांगलादेशच्या नॅशनल बोर्ड ऑफ रेव्हन्यू   ने जाहीर केलेला एक निर्णय . या निर्णयानुसार बांगलादेशची सुमारे ९० % आयात निर्यात होत असलेल्या चितगाव ( बंगाली उच्चार चितोग्राम )  बंदराचा आणि बांगलादेश मधील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे बंदर असलेल्या मोंगला बंदराचा भारताने कयमस्वरूपी वापर करण्याची    परवानगी बांगलादेशकडून देण्यात आली आहे यामुळे ईशान्य भारतात भारताच्या अन्य भागातून काही सामान पाठवणे तसेच ईशान्य भारतातून भारताच्या अन्य प्रदेशात सामानांची पाठवणी करणे सोईस्कर झाले आहे          बांगलादेशचा वापर न केल्यास पश्चिम बंगाल मधून त्रिपुरा मिझोराम आदी   राज्यात काही सामान पाठवायचे असल्यास सुमारे दीड हजार किलोमीटरचा वळसा मारून जावे लागते हा मार्ग भारतीय सुरक्षेतीचा विचार करता संवेदनशील असलेल्या सिलिगुडी कॉरिडॉर मधून जातो याउलट बांगलादेशचा वापर केल्यास हे अंतर काही शे किलोमीटर इतके कमी