Posts

Showing posts from April, 2023

भारताचा दक्षिण अमेरिका खंडात वाढता डंका

Image
  आपल्या भारताच्या जगभरात डंका सातत्याने वाढत आहे . जगभरातील कोणतेही क्षेत्र भारताच्या प्रभावापासून दूर राहिलेले नाहीये . पृथ्वीगोलाचा विचार करता भारताच्या पूर्णतः विरुद्ध असलेला दक्षिण अमेरिका खंड देखील त्यापासून सुटलेला नाहीये याच भागातील   गयाना ,  पनामा , कोलंबिया आणि डॉमिनिकन रिपब्लिक   या देशांना   आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ . एस . जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून एप्रिलच्या शेवटच्या आटवड्यात   अधिकृत भेट देणार आहेत . या देशांना त्यांची ही पहिलीच भेट असेल .   गयानामध्ये ,   21 ते 23   एप्रिल   या दरम्यान    परराष्ट्र व्यवहार मंत्री अनेक मंत्र्यांशी संवाद साधणार आहे . ते त्यांचे समकक्ष यांच्यासमवेत संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह - अध्यक्ष असतील . श्री ह्यू हिल्टन टॉड हे दोन्ही देशांमधील सर्व मुद्द्यांवर चर्चा करतील .    हा    गयाना दौरा भारतासाठी   कौन्सिल ऑन फॉरेन अँड कम्युनिटी रिलेशन्स (COFCOR); या   15 सदस्यीय कॅरिबियन   देशातील (CARICOM))   परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीची

बुद्धिबळ विश्वविजेतेपदाची चुरस कायम

Image
  सध्या आपल्या भारतात आय पी एल चा ज्वर असला तरी जागतिक पातळीचा विचार करता समस्त जगताचा नजारा बुद्धिबळाचा विश्वविजेता कोण होणार ? याकडे लागलेल्या आहेत . विद्यमान विश्वविजेता   मॅग्नस कार्लसन यांनी त्यांना विश्वविजेता पदाची स्पर्धा खेळण्यात उत्सुकता नसल्याचे जाहीर केल्यावर पहिल्यादाच   होणारी ही स्पर्धा त्यामुळे विशेष ठरत आहे मागील विश्वविजेता पदाचा आव्हानवीर नेपोमनिशी आणि या वर्षाचा विश्वविजेतेपदाचा आव्हानवीर ठरवण्यासाठी झालेल्या कॅन्डीडेट स्पर्धेचा विजेता डिंग लिरेन यांच्यात ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे   काझकिस्तानमधील   अस्ताना शहरात खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण १४ डाव खेळवण्यात   येणार असून खेळाडूंना जिंकल्यास एक गुण तर सामना बरोबरीत सुटल्यास अर्धा गुण देण्यात येणार असून जो खेळाडू सर्वप्रथम साडेसात गुणांची कमाई करेल त्यास विश्वविजेता म्हणून जाहीर करण्यात येणार आहे रविवार १६ एप्रिल सायंकाळचा विचार करता स्पर्धेत ६ डाव खेळण्यात आलेले असून दोन्ही खेळाडूंचे प्रत्ये

जी २० आणि भारत

Image
  भारत या वर्षी जी २०चे अध्यक्षपद भूषवत आहे हे एव्हाना सगळ्यांना माहिती असेलच . या अध्यक्षपदाच्या कालावधीत विविध   स्तरावरील अधिकारी मंत्रीगण यांच्या देशभरातील वेगवेगळ्या शहरात होणाऱ्या विविध परिषद देखील आता आपणास अंगवळणी पडल्या असतील . या विविध शहारत होणाऱ्या परिषदांमुळे भारताताची जगात एका वेगळी ओळख होत असल्याने आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत नसलो तरीही एक जवाबदार नागरिक म्हणून आपणास त्या माहिती असणे आवश्यक आहे ( स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीने एकवेळ स्वतःचे नाव विसरले तरी चालेल मात्र जी २० च्या परिषदेला विसरायला नको स्पर्धा परीक्षेत शहर आणि त्यांच्या विषय आणि आणि कोणत्या शहरात कधी परिषद झालीयावर पूर्व परीक्षेत हमखास प्रश्न येऊ शकतो   )  चला तर मग जाणून घेउया ७ एप्रिल पर्यंतच्या जी २०च्या परिषदा कोणकोणत्या शहरात झाल्या .       भारताला या परिषदेचे अध्यक्षपद मिळाले , १ डिसेंबर २०२२ ला . ते मिळाल्यानंतर अवघ्या तीनच दिवसानी म्हणजेच ४ डिसेंबरपासून उदय