यस ! वी अल्सो डू धिस !! ( YES WE ALSO DO THIS !!)

     


   यस ! वी अल्सो डू धिस !! ( YES WE ALSO DO THIS !!)  हो आम्ही देखील हे करून दाखवू शकतो हे भारताच्या दिव्यांगांच्या एशियाडमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी शनिवार २८ ऑक्टोबररोजी जगाला दाखवून दिले या वेळच्या एशियाडमध्ये सर्व साधारण गटात भारताने यावेळी १०० पदके मिळवून दाखवीलच असा निर्धार केला होता जो त्यांनी प्रत्यक्षात आणून देखील दाखवला त्यावेळी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला क्रिकेटखेरीज अन्य खेळात घवघवीत यश मिळाल्याच्या धक्का यावेळी भारतीयांना या खेळाडूंनी दिला यातूनच यस ! वी अल्सो डू धिस !! ( YES WE ALSO DO THIS !!) असा चंग  भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी दाखवत तो खरा करत सर्वसाधारण खेळाडूंच्या पदकतालिकेपेक्षा १ सुवर्ण आणि १० कास्य पदके मिळवत एकूण पदकतालिकेत सर्वसाधारण खेळाडूंपेक्षा ४ पदके जास्त मिळवत भारतीयांना एक मोठा सुखद धक्का दिला आहे त्याबाबदद्ल या खेळाडूंचे करावे तितके कौतुक कमीच आहे 

        शारीरिक अक्षमता हि मनुष्याला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही तर मनाचा निग्रहच त्यापासून रोखतो हे या यशातून स्पष्ट झाले आहे तसे बघायला गेलो तर सर्वसाधारण खेळ आणि हे दिव्यांगांचे खेळ याची तुलना काही जणांना अप्रस्तुत वाटेल . दोन्ही ठिकाणी असणारी आव्हाने वेगवेगळी असतात असे मानले तरी त्यांच्या त्यांच्या गटात ही आव्हाने अअसतातच  हे लक्षात घेता त्यांनी मिळवलेले यश किती मोठे आहे हे समजते , मूळ स्पर्धेनंतर होणाऱ्या दिव्यांगांच्या या स्पर्धेला मुख्य स्पर्धेच्या तुलनेत कमी प्रसिद्धी मिळते जे चुकीचेच आहे मूळ स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंवर विविध बक्षिसांचा वर्षाव होतो याउलट या दिव्यांगांच्या स्पर्धेतील विजेते फारसे

कोणाच्या लक्षात राहत नाही मुळात या खेळाडूंना अधिक बक्षिक्षाची रोजगाराची अधिक गरज असते . शारीरिक अक्षमतेवर मस्त करत त्यांनी खेळात प्रगती केलेली असते 

आपल्या भारतात जिथे सर्वसाधारण खेळाडूंना खेळाला पूरक अश्या सोइ सवलती मिळायला आता पर्यंत मारामारअसायची  दिव्यागांच्या अडचणी तर विचारायलाच नको शारीरिक अक्षमता असताना यांना खेळायची गरज ती काय असा सर्वसाधारण सूर असताना ज्यावेळी सर्वसाधारण गटातील खेळाडूंना मोठ्या संख्येने पदके मिळायला सुरवात झाल्यावर काहीच अगदी हाताच्या बॊटवर मोजता येतील इतक्या कमी दिवसात दिव्यांग खेळाडूंनी देखील तितकीच किंबहुना कणभर जास्तच पदके मिळवणे भारतीयांच्या आणि सरकार प्रशासनचा बदललेला दृष्टिकोनच स्पष्ट करत आहे आता या मध्ये लेखाच्या सुरवातीला सांगितलेल्या प्रमाणे सर्वसासाधारण खेळाडूंपेक्षा काहीसे अधिक लक्ष दिले तर भारत या क्षेत्रात मोठी झेप नकीच घेऊ शकतो शारीरिक अक्षमता असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांचे पालक या मुळे खचून न जाता समाजापुढे नवा आदर्श नक्कीच पुढे ठेवतील हे नक्की या सर्वांची सुरवात दिव्यांग खेळाडूंनी या स्पर्धेत मिळवलेल्या यशापासून झाल्यास ते सोन्याहून पिवळे असेल हे नक्की  



Comments

Popular posts from this blog

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?