पंतप्रधान मोदींना प्रदान होणार लोकमान्य टिळक पुरस्कार*


पंतप्रधान, नरेंद्र मोदी या नावाभोवती विलक्षण वलय आहे. अनेकांना त्यांच्याविषयी  उत्सुकता आहे, जी दिवसोंदिवस कमी होता वाढतच आहे. त्यांनी पंतप्रधान म्हणून कार्य जगाने अनुभवले आहे. त्या आधी गुजरात या भारतातील  क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचव्या क्रमांकावर असलेल्या राज्याचा सर्वांगीण केलेला विकास देखील सर्वांनी बघीतला आहे. मात्र या खेरीज पंतप्रधान मोदी यांचे कर्तृत्व मोठे आहे. सक्रीय राजकारणात येण्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी केलेले कार्य देखील मोठे आहे. या काळात त्यांनी काही काळ पुण्यात देखील कार्य केले आहे. या पार्श्वभूमीवरत्यांना देण्यात येणारा लोकमान्य पुरस्कार विशेष महत्तावाचा आहे. पुणे शहराची नाळ ओळखणाऱ्या, एका निस्पृह समाजसेवकाचा पुणे शहराने केलेला तो गौरव आहे.

      पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकमान्य टिळक दोघेही प्रखर देशभक्त . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर  भारताची बाजू प्रखरपणे मांडताना आपण त्यांना वारंवार बघतोच.लोकमान्य टिळक यांनी अँनी बेझंट यांच्या सहकार्याने सुरु केलेली होमरूल चळवळ असो किंवा आपल्या लेखणीद्वारे सरकारला अडचणीत णणारे मात्र समाज देशहिताच्या प्रश्न उपस्थित करुन त्या प्रश्नांचा निवारण्यासाठी सरकारला भाग पाडण्याचा त्यांनी केलेले प्रयत्न याचीच साक्ष देतात.

   लोकमान्य टिळक त्याच्या परखडपणासाठी प्रसिद्ध आहेत. ब्रिटीश काळात ब्रिटीशांच्या अत्याचाराविरोधात, "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, उजाडले पण सुर्य कोठे आहे? या सारख्या अग्रलेखनातून त्यांचा परखडपणाचे दर्शन आपणास होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेतृत्वाचा अभ्यास केल्यास आपणास देखील परखडपणा हा नरेंद्र मोदी यांचा गुण असल्याचे आपणास दिसून येते. त्यांच्या नेतृत्वात  काश्मीरविषय भारतीय

संविधानात असलेले कलम ३७० रद्द केल्यानंतर झालेल्या टिकेला दिलेले उत्तर असो किंवा सर्जिकल स्टाईकच्या वेळी विरोधकांना त्यांनी दिलेले उत्तर असो आपणास नेहमी त्याचा प्रत्यय येतो.

      नेतृत्वगुण हा देखील दोन्ही व्यक्तीमधील महत्तवाचे गुणवैशिष्ट्ये आहे. परराष्ट्र खात्यासंदर्भात मोदी सरकारचा कार्यकाळात आलेला करारीपणा याचेच प्रत्यंतर देत आहे. सुयोग्य नेतृत्वाच्या शिवाय परराष्ट्रमंत्री डॉ एस. जयशंकर असा करारीपणा दाखवणे अशक्यच. लोकमान्य टिळकांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंती, आणि सार्वजनिक गणेशोत्सव याची सुरवात करुन आपल्या नेतृत्व गुणाची ओळख करुन दिली होतीच

      वक्तृत्वकला हा देखील लोकमान्य टिळक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील समान दुवा आपण दोघांची भाषणे ऐकल्यास त्याचा प्रत्यय येतो.

    एका अर्थाने एका सर्वगुणसंपन्न व्यक्तीचा तितक्याच सर्वगुणसंपन्न व्यक्तीचा नावाने  दिलेल्या पुरस्कारामुळे दोघांचीच उंची मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.


Comments

Popular posts from this blog

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?