भारत जपान मैत्री चिरायू होवो


 मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवाड्यत २० आणि २१ मार्च रोजी जपानचे पंतप्रधान किसिंदा फुमिओ भारताचा अधिकृत दौऱ्यावर येत आहेत त्यावेळी ते पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दोन्ही देशांसासाठी महत्वाच्या असणाऱ्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक विषयावर चर्चा करण्याबरोबर जपान जी चा आणि भारत जी २० चा अध्यक्ष असल्याने दोन्ही देशांच्या प्राधान्यक्रमावर चर्चा करतील  कोणत्याही दोन देशातील परराष्ट्र संबंध हि सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे कोणत्याही देशांचे भविष्यतील संबंध कसे  राहतील या साठी भूतकाळात त्यांचे संबंध कसे होते यावर अवलुबुन असते जपानच्या पंतप्रधानाची हे भेट समजावून घेण्यासाठी आपणस या दोन देशातील संबंध कसे विकसित झाले हे अभ्यासाने महत्त्वाचे ठरेल

        मित्रानो मध्ययुगात चीनमार्फत बौद्धधर्म  जपानमध्ये पोहोचला . हे आपणास ज्ञात असेलच हे सांस्कृतिक आदानप्रदान झाले . आर्थिक आणि तंत्रज्ञाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास  त्यातही विशेषत्वाने भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जपानच्या ताकदीच्या सर्वप्रथम उल्लेख स्वामी विवेकांनद यांच्या पहिल्या अमेरिकेच्या प्रवासात येते . त्यांनी त्या वेळेस म्हणून ठेवले आहेच.  चीन आणि जपान निद्रिस्त ड्रॅगन आहेत . ते


जेव्हा जागे होतील तेव्हा जगाची झोप उद्वातील मात्र हा झाला ब्रिटिश इंडियातील उल्लेख .स्वातंत्रप्राप्तीनंतर जपानच्या ताकदीच्या उल्लेख येतो तो राजकपूर याचा श्री 420 या चित्रपटात " मेरा  जुता है जपानी " हे अजरामर गाणे आपल्याला अल्पावधीत जपानने केलेल्या प्रगतीची साक्ष देते .जपानने केलेल्या प्रगतीची घोडदौड सुरूच असून बहुचर्चित बुलेट ट्रेंनपासून विविध खत निर्मितीतीच्या प्रकल्पापर्यंत जपान आपणास साह्य करत आहे .  

                 राजनैतिकी भूगोलाच्या शेजारील राष्ट्राच्या पलीकडे असणारे राष्ट्र  आपले मित्र या सिद्धान्तानुसार आपण जपानशी 1962 च्या युध्द्दांनंतर संबंध वाढवण्यास सुरवात केली . हे साह्य नंतर अनेक क्षेत्रात विस्तारले . संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत नकाराधिकारासह कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी जर्मनी आणि ब्राझील समवेत G 4 या गटाची स्थापना करणे , आदीपर्यंत हा प्रवास झालेला दिसतो.  नुकतीच झालेली  मंत्रिपरिषदेची 2+2 बैठक या विषयीचा कळस म्हणता येईल . या आतापर्यंतचा वाटचालीत अनेक चढ उतार आले . उदाहरणार्थ  जेव्हा भारताने अणुस्फोट केला त्यावेळी जपानने आपल्यावर अनेक बंधने लादली . आणि आपले संबंध काही प्रमाणात दुरावले

 चीनच्या वाढत्या सागरी महत्त्कांक्षालेला आळा घालणे सोईचे व्हावे यासाठी  अनेकदा जपानी आरमार  आणि भारतीय नौदल हिंदी महासागरात संयुक्त आरमारी कवायती करत असतात . हे आपणास ज्ञात आहेच .  त्याचप्रमाणे जपानी व्यवस्थापनाविषयी देखील काही लोकांना माहिती असेलच , आपल्या भारताच्या अनेक कारखान्यात त्या व्यवस्थापन तत्वावर आधारित काम केले जाऊन अत्यंत कमी श्रमात अधिक उत्पादन काढले जाते . जपानी कार्टून विश्वाने भारतीय समस्त बालविश्व व्यापून गेलेले आपण बघतो आहेच , डोरेमॉन , निन्जा


हतोरी हि त्याची काही उदाहरणे भारतातील दुचाकी वाहनांच्या क्षेत्रात होंडा या वाहन उद्योग क्षेत्रातील कंपनीची उलाढाल आपणांस माहिती आहेच . मागच्या वर्षी अर्थात २०२२ साली जपानचे पंतप्रधान  फुमिओ किंशिंदा   हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून १९ आणि २०मार्चला  , भारतात आले होते  सन २०१४ पासून नियमितपणे भारत जपान यांच्यात वार्षिक बैठका होतात   त्याच्या १४ व्या  अधिवेशनासाठी ते आले होते  या परिषदेत  ,चीन , रशिया युक्रेन युद्ध  इंडो पॅसिफिक परिसरातील देशांचे परस्पर सहकार्य , परिसरात शांत टिकवणे याबाबत विविध बाबींवर चर्चा करण्यात आली या परिषदेत जपान येत्या पाच वर्षात भारतांमध्ये लाख २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली अमेरिकी चालनामध्ये याचे मूल्य अब्ज २० कोटी डॉलर होते तर जपानच्या चलनात ट्रीलीयन येन इतके होते याच्या आधी सन २०१४ मध्य जपानचे तत्कलीन पंतप्रधान योसिका मोरी यांनी जपान येत्या वर्षात भरता . ट्रीलीयन येन गुंतवूणक करणार असल्याची घोषणा केली होती मागील २०२२ वर्षी साली १९ मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी क्याड या गटाच्या बैठकीसाठी जपानची राजधानी टोकियाओला गेले होते चीनच्या वाढत्या दादागिरीला आळा घातला जावा यासाठी अमेररिकेच्या नेतुत्वात हा गट स्थापन करण्यात आला आहे या गटात आपला भारत , अमेरिका ऑस्टेलिया जपान हे सदस्य देश आहे याखेरीज सप्टेंबर महिन्यात भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथसिंग आणि  जपानचे परराष्ट्र मंत्री योषिमासा हयासी  Yoshimasa Hayashi)  आणि जपानचे संरक्षण मंत्रीयासुकाझू हामाडा ( Yasukazu Hamada ) यांच्यात + वार्ता झाली होती  या सर्व घडामोडीडींच्या पार्श्वभूमीवर आपण हि घडामोड अभ्यासलयास आपणस या भेटीचे महत्व समजून येते

Comments

Popular posts from this blog

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?