आता तरी बेक्सिट पूर्णपणे यशस्वी होईल का

 


आजपासून सुमारे अडीच वर्षांपूवी समस्त युरोप खंड  आणि युनाटेड  किंगडम (इंग्लंड ) यांच्यामध्ये मोठा कळीचा मुद्दा झालेल्याबेक्सिटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येत आहेआणि याला कारणीभूत ठरला आहे ज्या  मुद्यामुळे बेक्सिटची बोलणी बराच काळ चालली युनाटेड किंग्डमच्या तीन पंतप्रधांना  सत्ता सोडावी लागली तोच मुद्दा अर्थात बेक्सिट नंतर नॉर्दन आर्यलँड  हा  युनाटेड किंगडममधील भाग आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड  या देशातील  संबंध कसे राहतील ? या दोन्ही भागात  गुड फ्रायडे अग्रीमेंट या १९९९ साली करण्यात आलेल्या करारानुसार निश्चित करण्यात आलेले संबंध पूर्ववत राहतील काहाच . २७ फेब्रुवारी २०२३ साली युनाटेड किंग्डम या देशाचे पंतप्रधान ऋषी सुनाक आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यात या मुद्द्यांवर  करार करण्यात आला या करारामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे

यामुळे सुमारे दशक मोठ्या प्रमाणत हिंसाचार बाघितलेला नॉर्दन आयर्नल्ड पुन्हा एकदा २५ वर्षांनी संघर्षाचा केंद्रबिंदू झाल्याचा प्रतिक्रिया युनाटेड किंगडममध्ये उमटत आहे . सुनक यांनी या कराराचे "नवा अध्याय" म्हणून स्वागत केले, ते म्हणाले, "माझा विश्वास आहे की विंडसर फ्रेमवर्क उत्तर आयर्लंडच्या लोकांसाठी एक टर्निंग

पॉइंट आहे. ही आमच्या नातेसंबंधातील एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. आमच्यात कदाचित मतभेद झाले असतील. भूतकाळातील परंतु आम्ही सहयोगी, व्यापारी भागीदार आणि मित्र आहोत.या करारामुळे युनाटेड  किंगडममध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत हा लेख लिहण्यापर्यंतच्या  प्रतिक्रिया बघतां आणि बेक्सिटविषयी युकेमध्ये झालेल्या घडामोडी बघता ऋषी सुनाक याना मोठ्या अडचणींना सामोरे जाऊ शकते त्यांना या करारासाठी युनाटेड किंगडमच्या संसदेची मान्यता घ्यावी लागेल तिथे त्यांचा कास लागेल मात्र काही कंझरटीव्ह पक्षाच्या काही खासदारानी या साठी ऋषी सुनांक यांचे अभिनंदन करत त्याच्या पाठीशी उभे राहत असल्याचे जाहीर केले आहे . दोन वर्षांपूर्वी बेक्सिटची अंमलबाजवणी करताना नॉर्दन आयर्लंड या भागातून युकेच्या इतर भागात जाणाऱ्या मालावर सीमा शुक्ल आकारण्यास  त्यावेळच्या पंतप्रधानांनी मान्यता दिली होती तर गुड फ्रायडे अग्रीमेंटच्या नुसार देण्यात येणारी नॉर्दन आयर्लंड आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड मधील

खुली सीमा ठवण्याची सवलत सुरूच ठेवली होती यामुळे काही समस्या देशात निर्माण झाल्यामुळे त्यात नंतर काही सूट देण्यात आली होती त्यामुळे युरोपीय युनियन आणि युनाटेड किंगडम मधील बेक्सिटविषयक कराराच्या काही तरतुदीचा भंग झाला त्यामुळे युरोपीय युनियनमध्ये मोठ्या प्रमाणत नाराजी निर्माण झाली त्यामुळे हा

सुधारित करार करण्यात आला

   भारताच्याबाबत बोलायचे झाल्यास भारताला या घडामोडीबाबत युनाटेड किंगडममध्ये होणाऱ्या  राजकीय घडामोडी म्हह्त्वाच्या आहेत त्यामुळे तेथील विद्यमान पंतप्रधान बदलण्यात येतो का ? या गोष्टीला भारतासाठी महत्व्वाचे आहे ऋषी सुनाक याना या आधीच्या पंतप्रधानांना ज्या प्रकारे या मुद्यांवर सत्ता सोडावी लागली त्या प्रमाणे सोडावी लागते का हे बघणे उत्सुकतेचे ठरेल

Comments

Popular posts from this blog

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?