Posts

Showing posts from July, 2023

पंडित नेहरू थोरच

Image
  नुकतेच पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समाजकार्य असणाऱ्या एक ज्येष्ठ छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी यांनी पंडित नेहरू यांच्याविषयी एक विधान केले ज्या विधानामुळे महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणत वादंग उठला . त्या विधानामुळे भारताच्या आतापर्यतच्या वाटचालीत पंडित नेहरूंचे योगदान नक्की किती ? या मुद्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली त्याविषयीची वस्तुस्थिती सांगण्यासाठी हे लेखन पंडित नेहरू थोरच     तर मित्रानो , पंडित नेहरूंच्या कार्यकाळात पंडित नेहरूंच्या काही चुका झाल्या हे मान्य केले तरी त्यांचे योगदान पूर्णतः नाकरण्यासारखे नाही . दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात ९० देश वसाहतवादातून स्वतंत्र झाले या देशांनी लोकशाहीची वेगवेगळी स्वरूपे स्वीकारली . काही देशांनी अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारली तर भारतासारख्या काही देशांनी इंग्लडच्या धर्तीवर लोकशाहीची पद्धत जिला वेस्ट मिनिस्टर पद्धत म्हणतात ती स्वीकारली आज त्यानंतर सुमारे ७० ते ७५ वर्षांनी त्या त्या देशातील लोकशाहीची स्थिती

पंतप्रधान मोदींना प्रदान होणार लोकमान्य टिळक पुरस्कार*

Image
पंतप्रधान, नरेंद्र मोदी या नावाभोवती विलक्षण वलय आहे . अनेकांना त्यांच्याविषयी   उत्सुकता आहे , जी दिवसोंदिवस कमी होता वाढतच आहे . त्यांनी पंतप्रधान म्हणून कार्य जगाने अनुभवले आहे . त्या आधी गुजरात या भारतातील   क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचव्या क्रमांकावर असलेल्या राज्याचा सर्वांगीण केलेला विकास देखील सर्वांनी बघीतला आहे . मात्र या खेरीज पंतप्रधान मोदी यांचे कर्तृत्व मोठे आहे . सक्रीय राजकारणात येण्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी केलेले कार्य देखील मोठे आहे . या काळात त्यांनी काही काळ पुण्यात देखील कार्य केले आहे . या पार्श्वभूमीवर ,  त्यांना देण्यात येणारा लोकमान्य पुरस्कार विशेष महत्तावाचा आहे . पुणे शहराची नाळ ओळखणाऱ्या , एका निस्पृह समाजसेवकाचा पुणे शहराने केलेला तो गौरव आहे .       पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकमान्य टिळक दोघेही प्रखर देशभक्त . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर   भारताची बाजू प्रखरपणे मांडताना आपण त्यांना वारंवार बघतोच

फक्त 17कमी !

Image
  फक्त 17 कमी !  शीर्षक वाचून चमकलात ना ? कस्यासाठी 17 कमी ?, असा प्रश्न तूमच्या मनात निर्माण झाला असेल तर सांगतो , फक्त 17 कमी ही बाब , भारताच्या बुद्धीबळ गँडमास्टरच्या संदर्भात आहे . भारताचे हा मजकुर लिहीत असताना 83 ग्रँडमास्टर झाले आहेत . अजून १७ ग्रँडमास्टर झाल्यावर भारतात ग्रँडमास्टरांच्या संख्येचे शतक होईल . आपल्याकडे 100 या संख्येचे विशेष महत्त्व आहे . वयाची 100 वर्ष पुर्ण करोत , किंवा एखाद्या खेळाडूने 100 वा सामना खेळो त्याकडे विशेष बाब म्हणून बघण्यात येते आणि 83 या संख्येत 17 मिळवले की 100 ही संख्या तयार होते . म्हणून म्हटले अजून 17 बाकी आदित्य सामंत हे भारताचे 83 वे ग्रँडमास्टर ठरले आहेत .   त्यांनी 28 व्या अबू धाबी मास्टर्समध्ये पहिला GM नॉर्म आणि 3 ऱ्या एल लोब्रेगॅट इव्हेंटमध्ये दुसरा नॉर्म मिळवला . बील मास्टर टूर्नामेंट ओपनमध्ये शानदार कामगिरीसह , ते भारताचा 83 वा जीएम बनले 8 फेऱ्यांनंतर आदित्य यांचे सहा गुण झाले आहेत आणि ते सध्या बिएल मास्टर्सच्या पुढील फेरी

चंद्रयान 3 भारतीयांची अभिनंदनस्पद कामगिरी

Image
  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने 14 जुलैला देशाच्या प्रगतीत एका अभिनंदनस्पद कामगिरीची नोंद केली , हे एव्हाना आपल्याला माहिती झालेच असेल . सुमारे तीन वर्ष अथक प्रयत्न करत जगातील 210 देशांपैकी अत्यंत मोजक्या एका हाताची पाच बोटे सुद्धा त्यांची यादी करायला जास्त होतील , अशी कामगिरी अर्थात चंद्रावर यान पोहोचवण्याची भीम कामगिरी भारताने पुन्हा एकदा पार पाडली . ज्या देशाच्या अंतराळ संशोधन संस्थेची सुरवात ,   दिवाळीत आपण उडवतो त्या प्रकारची , मात्र दिवाळीतील रॉकेटच्या पेक्षा मोठी रॉकेट उडवत , एका पडक्या चर्चमध्ये झाली .   रॉकेटचे विविध भाग शास्त्रज्ञानी सायकलवर एखादी मोळी बांधून वाहतूक करावी , त्या पद्धतीने वाहून आणले , या पद्धतीने झाली . त्या संस्थेने अमेरिका रशिया आदि विकसित देशच्या तुलनेत अत्यंत किरकोळ खर्च्यात चंद्राला गवसणी घालावी हे नवलच . ते देखील स्पेस वॉर सारख्या एखाद्या हॉलिवूडमधील चित्रपटाची निर्मितीसाठी लागलेल्या रककमेपेक्षा कमी खर्चात , चंद्रमोहिमेची आखणी करण्यात आली