Posts

Showing posts from March, 2023

यूपीएससी बदलाच्या वाटेवर , एमपीएससीत कधी होणार बदल ?

Image
  लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक असणाऱ्या प्रशासनाची आपल्या भारतात अत्यंत मजबूत व्यवस्था आहे किंबहुना अशी व्यवस्था असे हे आपल्या संविधानाचे एक वैशिष्ट समजले जाते देशातील हा प्रशासनाचा गाडा ओढण्यासाठी दोन स्वायत्त संस्था कार्यरत आहेत प्रशासनातील जिल्हाधिकारी सारख्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी केंद्रीय स्तरावरची   यंत्रणा कार्यरत आहे जिला आपण युनियन पब्लिक सर्विस कमिशन अर्थात यूपीएससी या संक्षिप्त नावाने ओळखतो . उपजिल्हाधिकारी आणि त्यासारखी प्रशासनातील पदांवर कोणी काम करायचे यासासाठी देशभरात त्या त्या   राज्याचे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत या   स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनपैकी एक म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन . जी एमपीएस्सी   या नावाने प्रसिद्ध आहे         हे सांगायचे कारण की . देशपातळीवर अधिकारी निवडणाऱ्या   यूपीएससीमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत .   सरकारचे कार्य सुरळीत होण्यासाठी    खासदारांच्या अनेक समित्या कार्यरत असतात . या समित्या अभ्यासपूर्ण

संस्कृतला मिळणार उजाळा

Image
  लिथुआनिया , ईशान्य युरोपचा देश , तीन बाल्टिक राज्यांपैकी दक्षिणेकडील आणि सर्वात मोठा . लिथुआनिया हे एक शक्तिशाली साम्राज्य होते ज्याने पुढील दोन शतके पोलिश - लिथुआनियन महासंघाचा भाग होण्यापूर्वी १४ व्या शतकापासून १६व्या शतकापर्यत पूर्व युरोपच्या बहुतांश भागावर वर्चस्व गाजवले . लिथुआनिया १९१८ ते १९४० पर्यंतच्या स्वातंत्र्याच्या संक्षिप्त कालावधी शिवाय , लिथुआनिया १७९५ पासून रशियाचा   भाग होता , दुसऱ्या महायुद्धादरम्यान थोड्या काळासाठी जर्मनीच्या ताब्यात होता आणि 1944 मध्ये तो प्रजासत्ताक U.S.S.R मध्ये समाविष्ट झाला . ११ मार्च १९९०रोजी लिथुआनियाने आपल्या नवनिर्वाचित संसदेच्या एकमताने आपले स्वातंत्र्य घोषित केले . नवीन सोव्हिएत संसदेने ६ सप्टेंबर १९९१ रोजी लिथुआनियाचे स्वातंत्र्य मान्य केले . लिथुआनियाला २००४ मध्ये युरोपियन युनियन (EU) आणि नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनमध्ये प्रवेश देण्यात आला . राजधानी विल्नियस आहे . लिथुआनियाच्या उत्तरेला लॅटव्हिया , पूर्वेला आणि दक्षिणेला बेलारूस , पोल

भारत उभारती नव्हे झालेली महासत्ता

Image
  जगाच्या नकाश्यावर नजर फिरवली असता पाकिस्तान नंतर इराणच्या पश्चिमेला समुद्र काहीसा आता गेलेला दिसतो जागतिक राजकारणाचा विचार करता अत्यंत स्फोटक म्हणून ज्याचा उल्लेख होतो  ते इराणचे आखात म्हणजे हाच प्रदेश होय / या आखाताला ज्यांच्या समुद्रकिनारा लागून आहे त्यांना आखाती देश म्हणतात  प्रामुख्याने अरबी भाषा या प्रदेश्यात बोलली जाते मुस्लिम  बांधवांचा प्रदेश म्हणून हा प्रदेश ओळखला जातो अनेक भारतीय या प्रदेशात नोकरीच्या निमित्याने वास्तव्यास आहेत नैसर्गिक इंधनाचे कोठार असलेल्या या प्रदेशाशी भारताचे व्यापारी संबंध मोठ्या प्रमाणत आहेत  जे दिवसोंदिवस वाढतच आहेत   व्यापार करणे सोईचे व्हावे प्रदेश जागतिक बाजरपेठेत एक प्रबळ गट म्हणून उदयास यावा या हेतूने या प्रदेशातील देशांकडून  स्थापन करण्यात आलेली संघटना म्हणजे गल्फ कंट्री कोऑपरेशन होय हि संघटना तिच्या अद्याक्षरांवरून जी सी सी म्हणून ओळखली जाते सौदी अरेबिया कुवेत ओमान कतार बहारीन आणि युनाटेड अरब अमिरात हे सहा देश याचे संस्थापक सदस्य आहेत तर हे सर्व सांगायचे  कारण असे की २० मार्च रोजी सौदी अरेबिया देशाची राजधानी असलेल्या रियाध या शहरात झालेली पहिल

भारत जपान मैत्री चिरायू होवो

Image
  मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवाड्यत २० आणि २१ मार्च रोजी जपानचे पंतप्रधान किसिंदा फुमिओ भारताचा अधिकृत दौऱ्यावर येत आहेत त्यावेळी ते पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दोन्ही देशांसासाठी महत्वाच्या असणाऱ्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक विषयावर चर्चा करण्याबरोबर जपान जी ७ चा आणि भारत जी २० चा अध्यक्ष असल्याने दोन्ही देशांच्या प्राधान्यक्रमावर चर्चा करतील   कोणत्याही दोन देशातील परराष्ट्र संबंध हि सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे कोणत्याही २ देशांचे भविष्यतील संबंध कसे   राहतील या साठी भूतकाळात त्यांचे संबंध कसे होते यावर अवलुबुन असते जपानच्या पंतप्रधानाची हे भेट समजावून घेण्यासाठी आपणस या दोन देशातील संबंध कसे विकसित झाले हे अभ्यासाने महत्त्वाचे ठरेल         मित्रानो मध्ययुगात चीनमार्फत बौद्धधर्म   जपानमध्ये पोहोचला . हे आपणास ज्ञात असेलच हे सांस्कृतिक आदानप्रदान झाले . आर्थिक आणि तंत्रज्ञाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास   त्यातही विशेषत्वाने भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जपा